दीपिकाने तिच्या आवडत्या डिशचा फोटो केला शेअर; पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 4 May 2020

दीपिका पादुकोण सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. लॉकडाउन दिवसांत दीपिका पादुकोण पती रणवीर सिंगसोबत वेळ घालवत आहे. अशा परिस्थितीत ती स्वत: ची काळजी आणि स्वयंपाकाकडे देखील लक्ष देत आहे.

दीपिका पादुकोण सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. लॉकडाउन दिवसांत दीपिका पादुकोण पती रणवीर सिंगसोबत वेळ घालवत आहे. अशा परिस्थितीत ती स्वत: ची काळजी आणि स्वयंपाकाकडे देखील लक्ष देत आहे. इतरांप्रमाणेच दीपिका पादुकोणही आपल्या नवनवीन कुकिंग डिश शोधलं मीडियावरून शेअर करताना दिसत आहे. नुकताच तिने तिच्या आवडत्या डिशचा फोटो शेअर केला आहे. ही डिश पाहून तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटेल. 

तिने आपल्या गिल्टी प्लेजरचा देखील खुलासा केला आहे. आपल्या सर्वांना गोड किंवा आंबट काहीतरी आवडते. दीपिका पादुकोणला असे काहीतरी आवडते, जे पाहून तुम्हालाही ते खाण्याची इच्छा होईल. खरं तर, ही डिश वेगळी काही नसून मीठ-मसाला लावलेली कैरी आहे. 

कच्ची कॅरी ही जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे आणि त्याबद्दल दोन मते कुठेच नाहीत. असं फक्त आपल्यालाच नाही तर स्वत: दीपिका पादुकोणही असं म्हणत आहेत. तिने कॅरीचा फोटो शेअर केला आणि लिहिले, "तू सर्वोत्कृष्ट आहे. सगळ्यांपेक्षा छान, मी आत्तापर्यंत भेटलेल्या प्रत्येकापेक्षा आणि पुढे भेटणार आहे, त्यांच्यापेक्षाही उत्तम"

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

You're simply the best, better than all the rest Better than anyone, anyone I ever met..

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिकाने शेअर केलेल्या या फोटोला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकजण काहीना काही नवीन  दिसत आहे. अनेकजणांच्या कुकिंग स्किल वाढल्याचं देखील पाहायला मिळत आहे. यामध्ये सेलिब्रिटी देखील मागे नसून आपला लॉकडाऊनमधील वेळ जाण्यासाठी नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकजण ऍक्टिव्ह आहे. आपल्या चाहत्यांशी ते संवाद साधताना दिसत आहेत. 

या चित्रपटात रणवीर सिंग सोबत दिसणार 
या लॉकडाऊनमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण एकमेकांसोबत बर्‍यापैकी क्वालिटी टाइम घालवत आहेत. दोघेही या मिळालेल्या खूप मजा घेत आहेत. लग्नानंतर दोघांनीही पहिल्यांदा 83 चित्रपटात एकत्र काम केले आहे. दरम्यान कोरोना व्हायरसमुळे हा सिनेमा रिलीज होऊ शकला नाही. सध्या अनेक चित्रपट रिलीज होण्यासाठी तयार असून लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडले आहेत. यामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने आगामी काळात आणखी नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनेक चित्रपटांचे शूटिंग थांबले आहे, त्यामुळे चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या लहान कलाकारांवर मोठे संकट आले आहे. यासाठी सलमान खानने नुकतेच आपल्या बिंग ह्युमन संस्थेद्वारे त्यांच्यासाठी मदत पुरवली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News