दीपिकाने '८३' चित्रपटातील आपली भूमिका केली 'या' महिलांना समर्पित

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 February 2020
  • रणवीर सिंगची बॉलीवूडचा अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळख आहे. 'बाजीराव मस्तानी',पद्मावत,'गली बॉय' यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्याने आपल्या अभिनयाचं वेगळेपण दाखवलं आहे. रणवीर सिंगचा येणारा आगामी चित्रपट '८३' त्याच्या घोषणेपासूनच चर्चेत आहे.

रणवीर सिंगची बॉलीवूडचा अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळख आहे. 'बाजीराव मस्तानी',पद्मावत,'गली बॉय' यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्याने आपल्या अभिनयाचं वेगळेपण दाखवलं आहे. रणवीर सिंगचा येणारा आगामी चित्रपट '८३' त्याच्या घोषणेपासूनच चर्चेत आहे. हा चित्रपट भारताला पहिला वर्ल्ड काप जिंकून देणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार कपिल देव  यांच्या  जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंग साकारणार असून त्यांची पत्नी रोमी देवी यांच्या भूमिकेत दीपिका पदुकोण  दिसणार आहे. नुकतीच या दोघांची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. 

दीपिकाला ही भूमिका करायला मिळाली याचा तिने आनंद व्यक्त केला आहे. त्यावेळी ती म्हणाली की, भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या गेलेल्या क्षणाचा मला या चित्रपटाद्वारे भाग होता येत हे माझं भाग्यच आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक  यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते हे मी आणि माझ्या आईने चांगलंच अनुभवलं आहे. त्यामुळेच '८३' हा चित्रपट अशा स्त्रियांना समर्पित आहे.ज्यांनी आपल्या पतीला आयुष्यभर साथ देत अनेक तडजोडी केल्या आणि पतीला यशाच्या शिखरापर्यंत पोहचवलं आहे. 

वैयक्तिक जीवनात एक आदर्श जोडपं असणारे रणवीर आणि दीपिका चित्रपटात पुन्हा एकत्र येत आहेत. त्यामुळे पत्नीची भूमिका चित्रपटात कशा प्रकारे साकारणार हे पाहून औत्सुकतेचं  ठरणार आहे. 
 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News