दीपिका पादुकोण चे छपाकसाठी सिद्धिविनायकाला साकडे.  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 10 January 2020
  • छपाक हा चित्रपट आज  देशातील सर्व सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला.
  • छपाक  ह्यासारख्या संवेदनशील विषयावरील चित्रपटामुळे अख्ख्या  देशवासियांच्या भावना हेलावल्या असून याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

मुंबई : दीपिका पदुकोणचा छपाक ह्या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा रंगली होती. तिच्या चाहत्यांना तर छपाक ह्या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता होती. बॉलीवूड प्रेमींची तर ह्या संवेदनशील विषयावरील आधारित असलेल्या चित्रपटाविषयी उत्कंठा हि शिगेला पोहोचली होती.

अखेर छपाक हा चित्रपट आज  देशातील सर्व सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. छपाक  ह्यासारख्या संवेदनशील विषयावरील चित्रपटामुळे अख्ख्या  देशवासियांच्या भावना हेलावल्या असून याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

ह्याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने आज सिद्धिविनायकाच्या चरणी जाऊन नतमस्तक व्हायचे ठरवले आणि आज सकाळी तिने सिद्धिविनायकाला साकडे घालण्यासाठी प्रभादेवी गाठले आणि आपल्या लाडक्या बाप्पांचे दर्शन घेतले. दीपिका ह्यावेळेस सुंदर अशा ट्रॅडिशनल पेहरावात होती. विशिष्ट असे कोरीव काम असलेला पांढऱ्या रंगाचा परिधान केलेला चुडीदार हा दिवसभर चर्चेचा विषय होता.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News