फौजदार स्पर्धेची नवीन जहिरात लवकरात लवकर प्रकाशित करा -पंकजा मुंडे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सरकारने यात तत्काळ लक्ष घालावे अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली.

बीड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलिस उपनिरीक्षक पदासाठी शुक्रवारी  प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत एनटी-ड प्रवर्गाला एकही जागा आरक्षित केली नाही. त्यामुळे या प्रवर्गातील उमेदवारांमधून संताप व्यक्त होत आहे. राज्य शासनाने यात तत्काळ लक्ष घालावे आणि सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी मागणी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर शुक्रवारी दुय्यम सेवा अराजपत्रित ‘गट- ब’साठी संयुक्त पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. याअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक गट-ब (अराजपत्रित) पदाच्या ६५० जागांची भरती करण्यात येणार आहे. एकूण ६५० जागांपैकी ४७५ जागा या विविध प्रवर्गांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. परंतु शासन निर्णयाप्रमाणे ‘भज-ड’ (एनटी-ड) प्रवर्गासाठी सरळसेवा भरतीसाठी दोन टक्के जागा राखीव असतानाही या प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित दाखवली गेली नाही.

त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सरकारने यात तत्काळ लक्ष घालावे अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News