७५ टक्के उपस्थितीबाबतचा निर्णय पहिल्या सत्रासाठी शिथिल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 August 2020

७५ टक्के उपस्थितीबाबतचा निर्णय पहिल्या सत्रासाठी शिथिल

७५ टक्के उपस्थितीबाबतचा निर्णय पहिल्या सत्रासाठी शिथिल

कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने ऑनलाइन शिक्षण पध्दत सुरू आहे, तसेच अजून किती दिवस सुरू राहिल हे निश्चित सांगता येणार नाही. ७५ टक्के उपस्थितीचा निर्णय पहिल्या सत्रासाठी शिथिल करण्याबाबतचा अधिकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे महाविद्यालय, विद्यापीठाच्या विभाग प्रमुखांना देण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाने तसं परिपत्रकचं काढलं आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीनुसार ७५ टक्के अभ्यासक्रम हा प्रत्यक्षपणे पुर्ण करणे, उर्वरीत २५ टक्के अभ्यासक्रम ऑनलाइन पुर्ण करावा लागतो. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहणे शक्य नाही. तसेच अजूनही महाविद्यालये सुरू करण्यात आलेली नाहीत. विद्यालये सुरू केल्यानंतर सामाजिक अंतर, विद्यार्थी सुरक्षा आरोग्य इत्यादी बाबींचा करूनचं महाविद्यालये सुरू होतील. महाविद्यालये प्रत्यक्षात कधी सुरू होतील हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे टाळेबंदीचा कालावधी विद्यार्थ्यांचा उपस्थिती कालावधी म्हणून ग्राह्य धरण्याच्या सूचना या पूर्वीच देण्यात आल्या आहेत.

पहिले सत्र ऑनलाइन सुरू असल्याने शिथिल करण्याबाबत विद्यापीठातील विभागांचे विभागप्रमुख, महाविद्यालयांचे प्राचार्य आणि मान्यताप्राप्त संस्था यांनी परिस्थिती पाहून किंवा त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा असे प्रवेश विभागाच्या उपकुलसचिवांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News