'या' निर्णयामुळे मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर प्रवेशाचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 7 July 2020

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे भविष्य अवलंबून होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण कायम ठेवत विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय दिला.

मुंबई : पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षाप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला मात्र, या आरक्षणाविरोधात काहिंनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. सर्वोच्च न्यायालयाने यावर आज सुनावनी घेतली. यावेळी न्यायालय काय निर्णय देणार? याकडे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे भविष्य अवलंबून होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण कायम ठेवत विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय दिला. त्यामुळे पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आता आरक्षणानुसार प्रवेश मिळणार आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. ही विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आनंदाची बाब आहे. आरक्षणाची पुढीव सुनावणी १५ जुलै रोजी होणार आहे.  

आज राज्य शासनातर्फे सर्वोंच्च न्यायालयात ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी आणि वाय. सी. वालीया यांनी शासनाच्या वतीने बाजु मांडली. याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्यावतीने ज्येष्ठ विधीज्ञ पी. एस. नरसिंहा आणि ऍड संदीप देशमुख यांनी काम पाहिले. सकाळी अकराला सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन सुनावणीत श्री. पाटील आपल्या घरूनच सहभागी झाले होते. मराठा आरक्षणाला तांत्रीक तसेच कायदेशीर आक्षेप नोंदविण्यासाठी विविध पक्ष सुनावणीला उपस्थित होते. मात्र आजच्या सुनावणीत याचिकाकर्ते व राज्य शासन वगळता अन्य पक्षांना त्यात भाग घेण्याचे नियोजन नव्हते. यामध्ये मराठा आरक्षणाला स्थगिती मिळणार कींवा कसे याची मोठी उत्सुकता होती. स्थगिती न मिळाल्याने याचिकाकर्ते व राज्य शासन दोघांची व्युहरचना यशस्वी झाली, ही दिलासादायक बाब ठरली, अशी माहिती विनोद पाटील यांनी दिली. 

श्री. पाटील म्हणाले, आज झालेल्या सुनावणीत ही याचिका पाच सदस्यांच्या खंडपीठाकडे सुमावणीस द्यावी, या मागणीवर न्यायालयाने हा विषय पुढील सुनावणीत निर्णय होईल, तेव्हा विचारात घेऊ. मराठा आरक्षणाच्या आधारे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश आता पुर्वनियोजनानुसार होणार आहेत. त्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच त्याचे आदेश न्यायालयाकडून प्राप्त होतील. यावेळी ऍड श्‍याम दिवान, ऍड अरविंद दातार, ऍड सदावर्ते यांसह विविध सदस्य याचिकेतील मागणीला विरोध करण्यासाठी सुनावणीला हजर होते. मात्र त्याबाबत न्यायमूर्तींकडून त्यांना संधी मिळाली नाही.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News