राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अंतीम परीक्षेचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 30 August 2020

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अंतीम परीक्षेचा निर्णय

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अंतीम परीक्षेचा निर्णय

महाराष्ट्र - अंतीम परीक्षा होणार की नाही याचा गोंधळ आपण मागील महिन्यात पाहिला, आता विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास होणार नाही. तसेच नेहमीप्रमाणे सहज आणि सोप्या पध्दतीने परीक्षा व्हाव्यात याचा अभ्यास करण्यासाठी कुलगुरूंची एक समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. जाहीर केलेली समिती अहवाल सादर करेल. त्यानंतर अंतिम परीक्षेचा निर्णय घेण्यात येईल असे सामंत म्हणाले.

आज झूमच्या माध्यमातून १३ विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत मंत्रालयात ऑनलाइन बैठक झाली. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे बैठकीचे अध्यक्ष होते. एकाही विद्यार्थ्यांचे नुकसान न होता, परीक्षा कशा आयोजित कराव्यात तसेच त्या समान पध्दतीने कशा घेता येतील. याबाबत युजीसीच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं शक्य आहे का ? याचाही विचार करावा अशी सुचना उदय सामंत यांनी केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News