न्यायालय जो निर्णय घेईल तो मान्य

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 February 2020

न्याय देण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय सक्षम आहेत. न्यायालय़ जो निर्णय घेतील तो मान्य आहे.

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीला फाशी शिक्षा दिली पाहीजे. माझा न्याय व्यवस्थेवर पुर्ण विश्वास आहे, मात्र न्यायदान प्रक्रीय जलद झाली पाहीजे. तसेच कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हायला हवी त्यामुळे अत्याचार कमी होतील.

न्याय व्यवस्था योग्य आहे पण त्याचा वापर कधी कधी अयोग्य वापर होतो. हैद्राबाद येथील तरुणीवर चार आरोपींनी सामुहीक बलात्कार करुन तीला जिवंत जाळले. या प्रकरणामुळे संपुर्ण देश सुन्न झाला होता. आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी जणतेने केली होती. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला तेथे आरोपीला जिवंत जाळले पाहीजे अशीही मागणी जनतेकडून होत होती, पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी घेऊन गेले, आरोपी पळून जात असल्याचे पाहून त्य़ांचा इंन्काउंटर केला, अशा प्रकारची शिक्षा देण्याचा अधिकार कोणाला नाही. न्याय देण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय सक्षम आहेत. न्यायालय़ जो निर्णय घेतील तो मान्य आहे.
- राजेश बळीराम पाटील,  एम.जी.एम महाविद्यालय, नादेड

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News