या दोन कायद्यानुसार परीक्षा रद्द

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 16 July 2020
  •  प्रतिज्ञाापत्राद्वारे उच्च न्यायालयात माहिती

मुंबई :  कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल करण्यात आली. यावर राज्य सरकारने बुधवारी (ता.१५) उच्च न्यायालय आपली भुमीका स्पष्ट केली. 'दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा परिस्थितीत परीक्षा घेण्यात आली तर विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे आरोग्य धोक्यात येईल, त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन कायदा आणि महासाथ नियंत्रन कायद्यानुसार महाविद्यालयीन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला' अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञाापत्राद्वारे दिली. 

राज्य सरकारने कला, विज्ञान, वाणिज्य अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १९ जून रोजी शासन निर्णय काढून आदेश निर्गमीत केला. मात्र हा आदेश बेकायेशीर आहे, तसेच युजीसी अॅक्ट आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याच्या विरोधी आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय रद्द करावा अशी विनंती याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांच्याकडून अॅड. उदय वारुंजीकर यांनी केली. राज्य सरकारने आपली भुमीका एका आठवड्यात मांडावी असा आदेश न्यायालयांनी सरकारला दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने आपली भुमिका मांडली.

'युजीसीने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्यात परीक्षा घेणे शक्य नाही. ऑनलाईन परीक्षा आयोजिक करण्यासाठी महाविद्यालये, विद्यापीठांकडे पुरेसे साहित्य उपलब्ध नाही. राज्यातील वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे घरापासून परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना वाहनांची सोय नाही, तसेच इंटरनेट सेवा, वीज यांचा सुरळीत पुरवठा होत नाही. त्यामुळे परीक्षा काळात अनेक समस्या उद्धभवू शकतात अशा परिस्थितीत परीक्षा घेणे शक्य होणार नाही' असे मत राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञाापत्राद्वारे सादर केले. यावर न्यायालयाने सध्यातरी कोणतीही टिप्पनी केली नाही.

संसर्ग होण्याची शक्यता अधिक

कोरोनाचा संसर्ग अतिषय वेगाने होत आहे. उत्तरपत्रिका गोळा करताना आणि तपासताना एकमेकांच्या हाताखालून जातात त्यामुळे एकाला कोरोनाचा झाल्यास सर्वांना संसर्ग होण्याची शक्यता निर्माण होतो. असा परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची अधिक शक्यता असते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News