डेक्कन सायक्‍लोथॉन खुल्या गटात मानेची बाजी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

कोल्हापूर - डेक्कन सायक्‍लोथॉन स्पर्धेच्या खुल्या गटात सांगलीच्या दिलीप माने याने बाजी मारली. माने याने शिवाजी विद्यापीठ ते संकेश्वर ते परत शिवाजी विद्यापीठ असे १२० किलोमीटरचे अंतर सर्वांत कमी वेळेत पूर्ण केले. के.एस.ए.चे अध्यक्ष मालोजीराजे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. कोल्हापूर जिल्हा सायकलिंग असोसिएशनेच अध्यक्ष विजय जाधव, डेक्कन स्पोर्टसचे अध्यक्ष उदय पाटील, उपाध्यक्ष जयेश कदम, वैभव बेळगावकर, अभिषेक मोहीते, अतुल पोवार, अमर धामणे, संजय चव्हाण, प्रशांत काटे, समीर चौगुले, राजू लिंग्रस आदी उपस्थित होते. 

निकाल १२० कि.मी. (शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट ऑफ टेक्‍नॉलॉजी ते संकेश्वर पुन्हा शिवाजी विद्यापीठ) - पुरूषांमध्ये  दिलीप माने (सांगली), सुदर्शन देवडीकर (कोल्हापूर), प्रकाश ओलेकर (सांगली), वेदांत हेलर्नेकर (पुणे), ॲरॉन केन (लंडन, सध्या रा. पुणे), फ्लॅक नेल्सन (पल्लीतुरा, केरळ), अभिनात मुरली (केरळ), केवल्य सनमुद्रा(पुणे). 

५० कि.मी. (पुरुष)- शिवाजी विद्यापीठते आप्पाची वाडी ते पुन्हा शिवाजी विद्यापीठ)- हेमंत लोहार (कोल्हापूर), किरण बंडगर (सांगली), सिद्धेश पाटील (कोल्हापूर). तर महिलांमध्ये १६ ते ३६ वयोगट - प्रतिक्षा चौगुले (कोल्हापूर), निशाकुमारी यादव (सांगली), मानवी पाटील (गडहिंग्लज). 

३६ ते ५० वयोगट- रमा जाधव (सांगली), साजीद सय्यद (सांगली), जॉर्ज थॉमस (कऱ्हाड), ५० वर्षांवरील गट- नितीन नारगोलकर (कोल्हापूर), राम बेळगावकर (कोल्हापूर), जीवदास शहा (सातारा). तर महिलांमध्ये शिल्पा दाते (सांगली), नेहा टिकम (पुणे), सुचित्रा काटे (कोल्हापूर). ५० वर्षांवरील- अंजली भालिंगे (पुणे).  २० कि.मी. शिवाजी विद्यापीठ ते पंचतारांकित एमआयडीसी पुन्हा शिवाजी विद्यापीठ- १५ ते ३० वयोगट- श्रृती कुंभोजे (साजणी), ३० ते ५० वयोगट- सुमित्रा विश्वविजय खानविलकर (कोल्हापूर), आरती संघवी (कोल्हापूर). 

बक्षीस वितरण समारंभ महापौर सरिता मोरे,  शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते झाले. विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदिवडेकर, विजय जाधव, विश्वविजय खानविलकर, उदय पाटील, जयेश कदम, वैभव बेळगावकर, अभिषेक मोहिते आदी उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News