आता डेबिट/क्रेडिट कार्ड करता येणार "ब्लॉक-अनब्लॉक"

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 16 January 2020
  • एटीएम, डेबिट किंवा क्रेडिट कार्डला ब्लॉक किंवा अनब्लॉक करता येणार आहे.

मुंबई : डिजिटलायझेशनच्या काळात सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत, मात्र बँकिंगची अनेक कामे आपल्याला आजही बँकेत जाऊन किंवा कस्टमर केअरला फोन करून करावी लागतात. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड फ्रॉड झाल्यास ते कार्ड बंद करण्यासाठी आपल्याला कस्टमर केअरला कॉल करून बंद करावे लागते. मात्र आता ग्राहकांचा हा त्रास कमी होणार आहे. यासाठी आरबीआयने नवी नियमावली आणली आहे. 

यानुसार, एटीएम, डेबिट किंवा क्रेडिट कार्डला ब्लॉक किंवा अनब्लॉक करता येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे कार्ड जारी करणाऱ्या सर्व कंपन्यांना ग्राहकांना कार्ड ब्लॉक किंवा अनब्लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे सांगण्यात आले आहे. ही सुविधा एटीएमच्या मशिनमधून मिळू शकते. त्यासोबतच २४ तासांसाठी ही सुविधा उपलब्ध असणार आहे. 

त्यामुळे आरबीआयच्या या निर्णयामुळे ग्राहकांचा बँकिंग व्यवहार सोयीस्कर होणार आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News