कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना डॉक्टरांचा मृत्यू; व्हिडिओ होतोय व्हायरल

यिनबझ टीम
Tuesday, 24 March 2020
देशातील या विषाणूमुळे डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची ही पहिली घटना आहे. सोमवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. उसामा रियाझ असे या डॉक्टरांचं नाव असून अलीकडेच इराण आणि इराकमधून परत आलेल्या रूग्णांवर ते उपचार करीत होते.

जगात कोरोना विषाणूचा धोका वाढत चालला आहे. ज्याप्रकारे भारत कोरोनाशी लढाई लढत आहे, तसंच पाकिस्तानचे डॉक्टरही युद्धपातळीवर व्यस्त आहेत. दरम्यान, कोविड -१९ च्या रूग्णांवर उपचार करत असताना कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट भागात 26 वर्षांच्या डॉक्टरचा मृत्यू, सोशल मीडिया चर्चेचा विषय ठरला आहे.

देशातील या विषाणूमुळे डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची ही पहिली घटना आहे. सोमवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. उसामा रियाझ असे या डॉक्टरांचं नाव असून अलीकडेच इराण आणि इराकमधून परत आलेल्या रूग्णांवर ते उपचार करीत होते.

डॉक्टरांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर पोहोचताच हळहळ व्यक्त केली जात आहे. उसामा रियाझ अलीकडेच इराण आणि इराकमधून परत आलेल्या रूग्णांवर उपचार करीत होते. त्यांचा मृत्यआधीचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो उसामा रियाझचा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओत उसामा यांनी काय म्हटले आहे, त्याचे शब्द .. 'आसालामवालेकुम, आज आरोग्य चांगले आहे, म्हणून मी तुम्हाला सलाम करतो, मी तुम्हाला विनवणी करतो की या कोरोना विषाणूला विनोद समजू नये, हा विनोद नाही. '

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News