टिकटॉकवर व्हायरल होतोय 'हा' जीवघेणा व्हिडिओ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 February 2020
  • टिकटॉक हा एक छोटा व्हिडिओ तयार करण्याचे व्यासपीठ आहे, परंतु काहीवेळा त्याद्वारे विचित्र गोष्टी देखील व्हायरल होतात.
  • टिकटॉकवर आता एक नविन ट्रेंड सुरू झाला आहे, जो पालकांच्या चिंतेचा विषय बनला आहे.

टिकटॉक हा एक छोटा व्हिडिओ तयार करण्याचे व्यासपीठ आहे, परंतु काहीवेळा त्याद्वारे विचित्र गोष्टी देखील व्हायरल होतात. टिकटॉकवर आता एक नविन ट्रेंड सुरू झाला आहे, जो पालकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. टिकटॉकवर 'स्कल ब्रेकर' नावाचे आव्हान खूप वेगवान व्हायरल होत आहे. त्याच्या नावावरून समजते की, या आव्हानात लोक असे काहीतरी करीत आहेत ज्यांने मान आणि डोके फुटण्याची शक्यता आहे.

कसे आहे 'स्कल ब्रेकर' आव्हान

हे आव्हानात तीन लोक असणे आवश्यक आहे, जे एकमेकांच्या शेजारी उभे आहेत. एक मध्यभागी उभा आहे आणि इतर दोन त्याच्या शेजारी आहेत. पहिले बाजूची दोन्ही मुले उडी मारतात. त्यानंतर मधल्या पण तशीच उडी मारयला सांगतात. मधल्याने उडी मारताच दोन्ही बाजूचे लोक त्याच्या पायावर लाथ मारतात, ज्यामुळे तो पाठीवर जमिनीवर पडतो. यावेळी, त्याच्या डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत होण्याचा धोका आहे.

 

टिकटॉकवर ट्रेंड होणाऱ्या या आव्हानमुळे मुलांचे आई-वडिल खूप नाराज आहेत, कारण त्यामुळे प्राणघातक जखम होण्याचा धोका आहे.  

स्पेनच्या एक व्हिडिओने सुरू झाले हे आव्हान

स्कल ब्रेकर आव्हानला स्पेनमध्ये सुरुवात झाली, जिथे शाळेतल्या दोन मुलींनी या आव्हानाची व्हिडिओ पोस्ट केली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बरेच लोक जखमी झाले आहेत. युरोप आणि अमेरिकेच्या बर्‍याच वापरकर्त्यांना या आव्हानाचा परिणाम झाला आहे.

 

सध्या भारतात असा कोणताही व्हिडिओ दर्शविला गेलेला नाही, परंतु हे अॅप लोकांमध्ये इतके लोकप्रिय आहे की, येथेही व्हायरल होण्यास जास्त वेळ लागणार नाही. अशा परिस्थितीत आपल्या मुलांना जागरूक करणे महत्वाचे आहे.

हे आव्हान मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपवरही शेअर केले जात आहे. काही व्हिडिओमध्ये, स्कल ब्रेकर आव्हानामुळे काय घडू शकते हे दर्शविले जात नाही. परंतु डॉक्टर म्हणतात की, यामुळे डोके ते कंबरपर्यंत अनेक गंभीर जखम होऊ शकतात. यामुळे शरीराच्या प्रत्येक सांध्यामध्ये फ्रॅक्चर देखील होऊ शकते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News