UGC आणि CSIR NET या परीक्षेसाठी शेवटची तारीख जाहीर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 June 2020

यूजीसी आणि सीएसआयआर नेट यासह अनेक परीक्षांच्या अर्जाची अंतिम तारीख वाढविण्यात आली आहे. अर्जाची तारीख वाढविण्याबाबत नोटीस एनटीए वेबसाइटवर जारी करण्यात आली आहे

यूजीसी आणि सीएसआयआर नेट यासह अनेक परीक्षांच्या अर्जाची अंतिम तारीख वाढविण्यात आली आहे. अर्जाची तारीख वाढविण्याबाबत नोटीस एनटीए वेबसाइटवर जारी करण्यात आली आहे. यूजीसी, सीएसआयआर नेट, इग्नू पीएचडी आणि ओपेनमॅट, जेएनवीई आणि आयसीएआर परीक्षा अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपूर्वी आधीच अनेक वेळा वाढविण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे देशभरात शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था बंद आहेत. कोरोना विषाणूच्या साथीच्या परिस्थितीमुळे बर्‍याच विद्यार्थ्यांना या परीक्षांसाठी वेळेवर अर्ज करता आला नाही आणि त्यांनी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढे वाढवण्याची विनंती केली होती, त्यामुळे पुन्हा एकदा या परीक्षांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख पुढे वाढविण्यात आली आहे.

यूजीसी नेट २०२०  साठी अर्ज करण्याची तारीख ३१ मे २०२० पर्यंत वाढविण्यात आली होती. आता ते १५ जून २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. यासंदर्भातील महिती मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यन्नी हे ट्विट केळी आहे.

सीएसआयआर-नेट जून २०२०

जॉइंट सीएसआयआर-नेट जून २०२० साठी अर्ज करण्याची तारीख देखील ३१ मे २०२० पर्यंत वाढविण्यात आली होती, जी आता १५ जून २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे.

इग्नू पीएचडी आणि ओपेनमॅट

इग्नू पीएचडी आणि ओपेनमॅट परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १५  जून २०२०  पर्यंत केली जाईल.

आयसीएआर - २०२०

भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) – २०२०  च्या अर्जाची तारीख १५  जून २०२०  पर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मे २०२० होती.

जेएनयूई

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. यासाठी, आता आपण १५ जून २०२० पर्यंत अर्ज करू शकता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News