CET परीक्षेच्या ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात यावी: युवासेना

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 16 April 2020
  • ही परीक्षा 13 एप्रिलपासून नऊ दिवस 18 पाळ्यांमध्ये होणार होती. लॉकडाऊनमुळे सीईटी सेलने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई: केंद्र सरकारने लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या 14 प्रवेश परीक्षांबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. या परीक्षांचे नियोजन कसे करायचे, हा प्रश्‍न सीईटी कक्षाला पडला आहे. मुदत असूनही हजारो विद्यार्थ्यांना एमएचटी सीईटीचे अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी द्यावी, अशी मागणी युवा सेनेने केली आहे.

राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी घेण्यात येते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सीईटी सेलने एमएचटी सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातून पाच लाखांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा 13 एप्रिलपासून नऊ दिवस 18 पाळ्यांमध्ये होणार होती. लॉकडाऊनमुळे सीईटी सेलने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा या परीक्षेसाठी अर्जदार विद्यार्थ्यांच्या संख्येत एक लाख 11 हजार 613 एवढी वाढ झाली आहे. राज्याबाहेरच्या 16 हजार 962 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विविध कारणांमुळे राज्यातील हजारो विद्यार्थी परीक्षेसाठी नोंदणी करण्यापासून वंचित राहिले आहेत. सीईटी पुढे ढकलल्याने इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News