CET परीक्षेच्या ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात यावी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 15 April 2020
  • राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्रची मागणी

मुंबई: लॉकडाऊन वाढल्याने आता सीईटी परीक्षेची ऑनलाइन नोंदणी करण्यास पुन्हा मुदतवाढ द्यावी अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत आहे. कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सामाईक परीक्षा कक्षाने (सीईटी) विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुढे ढकलल्या आहे. अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे आता नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी इत्यादी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ( एमएच-टीसीईटी) घेण्यात येते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सीईटी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला. राज्यभरातून तब्बल ५  लाखापैक्षा अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. तब्बल ९ दिवस १८ शिफ्ट मध्ये ही परीक्षा १३ एप्रिल पासून होणार होती. लॉक डाऊनलोड मुळे ( सीईटीसेल) ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षीपेक्षा यंदा या परीक्षेला १ लाख ११ हजार ६१३ विद्यार्थ्यांची वाढ झाली तर राज्याबाहेरचे १६ हजार ९६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. विविध कारणामुळे राज्यातील अनेक विद्यार्थी सीईटी  परीक्षेची नोंदणी करण्यापासून वंचित राहिले आहेत. सध्या सीईटी पुढे ढकलल्याने ही परीक्षा देण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्याची संधी मिळावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना काही अपरिहार्य कारणामुळे नोंदणी करणे शक्य झाले नाही. काही विद्यार्थ्यांची नोंदणी केली. मात्र, नोंदणी नंतर शुल्काचा भरणा करणे शक्य झाला नाही. यामुळे अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काग्रेसच्या वतीने केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News