या सरकारी नोकरीची शेवटची तारीख वाढली; १.७७ लाखांपर्यंत मिळणार पगार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 21 April 2020

लॉकडाऊनमुळे ही तारीख 10 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली होती आणि आता ती तिसऱ्यांदा 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. म्हणजेच पात्र आणि इच्छुक उमेदवार 30 एप्रिल 2020 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजीने (एनआयईएलआयटी) तिसऱ्यांदा अर्ज करण्याची तारीख वाढविली आहे. फेब्रुवारी महिन्यात एनआयईएलआयटीने सायंटिस्ट आणि टेक्निकल असिस्टंटच्या पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती. ज्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 मार्च निश्चित करण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे ही तारीख 10 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली होती आणि आता ती तिसऱ्यांदा 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. म्हणजेच पात्र आणि इच्छुक उमेदवार 30 एप्रिल 2020 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

१. ७७ लाखांपर्यंत पगार 

या सरकारी भरतीसाठी निवडलेल्या उमेदवाराला १.७७ लाखांपर्यंत पगार मिळणार आहे. अधिकृत अधिसूचनेमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार सायंटिस्ट 'बी' ग्रुप 'ए' लेव्हल १० अंतर्गत, ५६,१०० ते १,७७,५०० रुपये पगार देण्यात येईल. त्याच बरोबर सायंटिस्ट / टेक्निकल असिस्टंट 'ए' ग्रुप 'बी' अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना लेवल ६ अंतर्गत प्रत्येक महिन्यात ३५,४०० ते १,१२,४०० रुपये पगार मिळेल.

४९५ जागांसाठी भरती

या रिक्त जागे अंतर्गत वैज्ञानिक आणि तांत्रिक सहाय्यक पदासाठी ४९५ उमेदवारांची भरती होणार आहे. यामध्ये वैज्ञानिक 'बी' या पदावर २८८ जणांची तर तांत्रिक सहाय्यक पदावर २०७ लोकांची निवड केली जाईल.

पात्रता

अधिसूचनेनुसार या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची वयोमर्यादा 30 वर्षे निश्चित केली आहे. त्याचबरोबर शासकीय नियमानुसार इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही सूट देण्यात आली आहे. दोन्ही पदांनुसार वेगवेगळ्या पात्रता व अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. लेखी परीक्षा आणि दोन्ही पदांच्या मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. 

शेवटची तारीख

नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर म्हणजेच एनआयईएलआयटीच्या नव्या अधिसूचनेनुसार आता उमेदवार 30 एप्रिलपर्यंत घरी बसून ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरतीची अंतिम तारीख 10 एप्रिल होती. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट calicut.nielit.in वर जाऊन अर्ज करू शकतात. भरती संबंधित अर्जाची प्रक्रिया व इतर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News