या तारखेला विद्यार्थ्यांना मिळणार दहावीची गुणपत्रिका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 August 2020

या तारखेला विद्यार्थ्यांना मिळणार दहावीची गुणपत्रिका

या तारखेला विद्यार्थ्यांना मिळणार दहावीची गुणपत्रिका

महाराष्ट्र - दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्षात गुणपत्रिका केव्हा हातात पडेल, या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून १७ ऑगस्टपासून गुणपत्रिका देण्यात येणार आहे. कोरोनाची परिस्थिती पाहून शाळांनी गुणपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात याव्यात अशी सुचना राज्य मंडळाने केली आहे.

कोरोनाचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्यानंतर अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या, तसेच झालेल्या परीक्षांचे निकाल यंदा उशीर जाहीर केले. गुणपत्रिका विद्यार्थ्यांना देताना अनेक उपाययोजना कराव्यात, त्याचबरोबर अनेक खिडक्यांचे नियोजन करून गुणपत्रिका देण्यात याव्यात असं राज्य मंडळाने स्पष्ट केलं आहे.

विभागीय मंडळाकडून १४ ऑगस्ट पासून १७ ऑगस्टपर्यंत शाळांना गुणपत्रिका देण्यात येणार आहेत. त्यानंतर १७ ऑगस्टनंतर शाळांच्या सोयीनुसार विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करावे. विशेष म्हणजे ठराविक वेळेत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका घेऊन जाण्याची सक्ती करू नये. शाळेमध्ये गुणपत्रिका वाटप करताना एकाचवेळी पालकांची आणि विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही याबाबत नियोजन करावे असे आदेश राज्य मंडळाचे सचिव डॉ. भोसले यांनी विभागीय मंडळाच्या सचिवांना दिले आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News