दर्शन पांडवगडाचे

यिनबझ टीम
Sunday, 17 February 2019

पांडवगड हा इ.स ११७८ ते ११९३ साली बांधण्यात आला. हा किल्ला राजा भोज यांनी बांधला. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कृष्ण नदीच्या काठी हा किल्ला उभारला आहे. कृष्णा नदीच्या उत्तरबाजूस रायरेश्वरापासून निघणारी महादेव रांग आहे. संह्याद्रीच्या या रांगेतील एका शिंगावर पांडवगड नावाचा किल्ला बांधलेला आहे. समुद्रसपाटीपासून १ हजार २७३ मीटरच उंच (४ हजार १७०फूट) असलेल्या पांडवगडाला जाण्यासाठी वाईमध्ये दाखल व्हावे लागते. हा किल्ला वाई-पुणे-बंगलोर या महामार्गच्या पश्चिमेला आहे. 

साधारणपणे इ.स ११७८ ते ११९३ या काळात राजा भोजने जरी हा किल्ला बांधला असला तरी पुढे तो आदिलशाहीत गेला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला जिंकूण १६७३ साली हिंदवी स्वराज्यात आणले आणि १७०१ साली हा किल्ला मोगलांकडे गेला. अखेर मेजर थचरने १८१८सालामध्ये किल्ला कंपनी सरकारच्या ताब्यात घेतला. गडावर गडाची देवी पांडवजायचे मंदिर आहे.  पांडवगडाच्या माथ्यावरून खाली वाई तसेच कृष्णा नदीही दिसते. केजळगड, माढरदेव, चंदन-वंदन किल्ले तसेच वैराटगडसुध्दा या किल्ल्यावरून पाहता येतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News