अंधाऱ्या रात्री नंतरची प्रकाशमय सकाळ

अनुजा पाटील
Wednesday, 21 October 2020

या अंधाऱ्या रात्री नंतर एक प्रकाशमय सकाळ..
आपली वाट बघत आहे..
तरीही त्या अंधाराच्या भितीत..
त्या प्रकाशाकडे पोहोचणं आपलं राहूनच जात...

अंधाराची संकल्पना आपल्या मनात ठाम असते..
जरा दुःख आलं नाही की..
पौर्णिमेच्या चांदण्या रात्रीही आपल्याला..
अमावस्येची ती काळी रात्र जाणवते...
अंधाराला सामोरे जायची आपली तयारीच नसते..
आणि आपण मात्र प्रकाशाचा अट्टाहास धरतो...
आपल्याला माहीत असतं की..
या अंधाऱ्या रात्री नंतर एक प्रकाशमय सकाळ..
आपली वाट बघत आहे..
तरीही त्या अंधाराच्या भितीत..
त्या प्रकाशाकडे पोहोचणं आपलं राहूनच जात...
आज एक वेगळं चित्र पहायला मिळालं...
संपूर्ण आयुष्य अंधारमय असतानाही...
स्वतःच्या कलेने त्यांना लखलखता प्रकाश निर्माण करताना पाहिलं.....
त्या लख्ख प्रकाशाकडे पाहताना..
नजर माझी खाली झुकली होती...
सगळं काही देऊनही देवाकडे तक्रार करताना ..
आता मलाही लाज वाटत होती....
खर सांगायचं तर 
दिसत असूनही बऱ्याच गोष्टी.
आज पर्यंत मी पाहिल्या नव्हत्या..
आणि न दिसणाऱ्या या डोळ्यांनी ..
आज मला बरच काही दाखवलं होत...
आज एवढंच सांगेन...
तुमच्यासारखा लख्ख प्रकाश
निर्माण करणं मला जमणार नाही..
पण त्या प्रकशापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मी नक्की करेन...
जर कोणी मला विचारलं की..
एवढं दुःख असताना कसं जगायचं...
तर मी त्यांना एवढच सांगेन..
स्वतःच्या आंतरिक गुणांना ... फुलवून..
अगदी या गोड फुलासारखं जगायचं...

- अनुजा पाटील

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News