अनाथ मुलीच्या विवाहाला सरसावले दानशूरांचे हात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 February 2020

काही वर्षांपूर्वी पोलिसांच्या वाहनात आलेली अनाथ मुलगी आज अनाथालयातून सजलेल्या डोलीत जाताना पाहून मनस्वी आनंद होत आहे. 
- संतोष गर्जे, बालग्राम, गेवराई (जि. बीड)

बीड : अनाथ मुला-मुलीचा सांभाळ करणाऱ्या बालग्राम अनाथालयातील प्राजक्ताचा विवाह सोहळा रविवारी (ता. २३) झाला. प्राजक्ताचे सुराणा परिवार व गर्जे परिवाराने कन्यादान केले. शेकडो वऱ्हाडींच्या आशीर्वादाने हा विवाह पार पडला.

बालग्राममध्ये चौदाव्या वर्षी अनाथ म्हणून दाखल झालेल्या प्राजक्ताचा संतोष गर्जे व प्रीती गर्जे यांनी मुलीप्रमाणे सांभाळ केला. प्राजक्ताचा (वय २०) विवाह लक्ष्मीबाई जयसिंग चव्हाण यांचे चिरंजीव नवनाथ (ढोक बाभूळगाव, ता. मोहोळ, जि सोलापूर) यांच्याशी पार पाडला. प्राजक्ताचे शिक्षण दहावी झालेले असून, नवनाथने बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. नवनाथ यांचा सीसीटीव्ही कॅमेरे विक्रीचा आहे. कविता व गौतम सुराणा (रा. परभणी) यांनी प्राजक्ताचे मानसकन्या मानून पालकत्व स्वीकारून विवाहाची व नंतरच्या कौटुंबिक कार्यक्रमाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी आपल्या मुलीप्रमाणे कन्यादानदेखील केले. प्रीती व संतोष गर्जे यांनी सांभाळ केलेल्या अनाथ प्राजक्ताला कन्यादान करत आई-वडिलांची उणीव भासू दिली नाही. गेवराईत या विवाहाप्रसंगी अनेक दानशूरांनी संसारोपयोगी साहित्य भेट दिले. या वेळी पद्मश्री रवींद्र कोल्हे, गिरीश कुलकर्णी, आमदार लक्ष्मण पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी विवाहप्रसंगी उपस्थिती दर्शवून आशीर्वाद दिले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News