हा आहे सातारा जिल्ह्यातील खतरनाक जंगली जयगड

यिनबझ टीम
Sunday, 17 February 2019

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. या धरण्याच्या भिंतीजवळ कोयनानगर हे छोटंस टुमदार गाव वसलेले आहे. या गावपासून १२ किलो मीटरच्या अंतरावर जंगली जयगड हा किल्ला आहे. या किल्ल्यावर व आजूबाजूस असलेल्या दाट जंगलामुळे या किल्ल्याला जंगली जयगड हे नाव देण्यात आले होते. आजही या भागात दाट जंगल असून जंगलात वाघ, बिबटे, अस्वल यांसरखे हिंस्र प्राणी असल्याने या गडावर कोणीही रात्री मुक्काम करत नाही.

घाटमाथ्याच्या टोकावर असणाऱ्या या किल्ल्यावरून कोकणाचं विस्तृत दर्शन होते. या गडाचे स्थान पाहाता याचा उपयोग कुंभली घाटावर व आजूबाजूच्या प्रदेशांवर लक्ष ठेवण्यासाठी होत असावा. हा किल्ला चढण्यास सोपा असून गर्द जंगलातून जाणाऱ्या रस्त्यामुळे हा एक दिवसाचा अल्हाददायक ट्रेक होऊ शकतो.

गडाच्या उजव्या बाजूस खाली कोळकेवाडी धरण व त्याच्या बाजूच्या डोगंरावर वसलेल्या कोळकेवाडी किल्ल्याचे दर्शनसुध्दा या जंगली जयगड किल्ल्यावरून घेता येते. समोरच्या बाजूस दूरवर चिपळूण शहर वाशिटी खाडी दिसते. किल्ला छोटा असल्यामुळे ३० मिनिटांत हा किल्ला फिरून होतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News