घामाघूम मुंबईकरांना त्वचारोग!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 4 May 2019
  • वाढत्या उकाड्यामुळे घामेजून त्वचारोगाची लागण
  • गजकर्ण आणि जीवाणूजन्य संसर्गामुळे नागरिक हैराण

मुंबई : वाढत्या उकाड्यामुळे घामेजून गेलेल्या मुंबईकरांना आता त्वचारोगाची लागण होत आहे. गजकर्ण आणि जीवाणूजन्य संसर्गामुळे नागरिक हैराण झाले आहेत. घाम साचून राहिल्यामुळे बुरशीजन्य संसर्ग वाढत असल्याचे त्वचारोग तज्ज्ञांनी सांगितले. 

उन्हाळा सुरू झाल्यापासून ताप आणि डोकेदुखीने त्रस्त झालेल्या मुंबईकरांनी दवाखान्यांबाहेर रांगा लावल्या होत्या. सतत उन्हात राहिल्यामुळे डोकेदुखी आणि अशक्तपणाच्या तक्रारी आजही येत असल्याचे डॉक्‍टर सांगतात. अंगदुखीमुळेही मुंबईकरांना रोजचा प्रवास झेपेनासा झाला आहे. सध्या मुंबईचे कमाल तापमान नियंत्रणात असले, तरीही उकाडा वाढला असून, कमाल आर्द्रता ९० टक्‍क्‍यांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे काही मिनिटांसाठीही घराबाहेर राहिल्यास घामाच्या धारा वाहात असल्याचा अनुभव मुंबईकर घेत आहेत. 

या वातावरणामुळे त्वचारोगांच्या तक्रारी वाढल्याची माहिती दादर येथील खोपकर्स क्‍लिनिकचे डॉ. उदय खोपकर यांनी दिली. त्वचारोगाच्या रुग्णांमध्ये १२ टक्के वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे त्वचेची काळजी घ्या, काम असेल तरच घराबाहेर पडा, अंगावर जास्त काळ घाम टिकणार नाही, याची काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी दिला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News