तरुणाईमध्ये दांडियाची क्रेझ इतकी का असते?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 6 October 2019

शाळा-कॉलेजच्या परीक्षा सुरू असल्या तरी त्यांचा उत्साहावर काहीच परिणाम झालेला नाही.  

अभ्यास सांभाळून दांडियामध्ये सहभागी होतात.

आपल्या शहरात विविध मंडळांचा गरबा असतो. तरुणाईमध्ये दांडियाचे आकर्षण खूप आहे. गरब्याला बॉलिवूड टीव्ही मालिकांचे कलाकार गायक हे हजेरी लावत असतात. त्यांना पाहायला खूप गर्दी होते. गरबा खेळण्यासाठी तरुण-तरुणी खास पेहराव करून येत आहेत.

शाळा-कॉलेजच्या परीक्षा सुरू असल्या तरी त्यांचा उत्साहावर काहीच परिणाम झालेला नाही.  अभ्यास सांभाळून दांडियामध्ये सहभागी होतात.  त्यामुळे अभ्यासही होतो आणि गरब्याचा आनंदही लुटता येतो. काही ठिकाणी नवरात्रोत्सवानिमित्त पाककला, रांगोळी, मेहंदी अशा विविध स्पर्धा घेतल्या जात आहेत. तसेच गरब्यामध्ये महिला आणि मुलींनाच प्रवेश दिला जातो. येथे ओळखीतल्या पुरुषांनाच प्रवेश दिला जातो.

रात्री १० वाजेपर्यंतच गरब्याला परवानगी असली, तरी वेळेचे बंधन पाळूनही गरबाप्रेमी आनंद लुटताना दिसत आहेत. नवरात्रोत्सव म्हटले की, सर्वप्रथम दांडिया आठवतो. पण, यंदा सर्वत्र गरब्याचीच धूम अधिक आहे. त्यामुळे गाण्यांच्या ठेक्यावर तरुणाई गरबा खेळताना दिसत आहे. 

दांडिया खेळण्यासाठी कलाकार आल्यावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. १० वाजेपर्यंतच गरब्याला परवानगी असली, तरी वेळेचे बंधन पाळूनही गरबाप्रेमी आनंद लुटताना दिसत आहेत.  गरब्याच्या परिसरात वाहतूककोंडीही होताना दिसत आहे. अनेक मंडळांतर्फे विविध स्पर्धा राबवण्यात येतात, नवनवीन खेळदेखील घेतले जातात. तरुणाई नवीन गाण्याच्या ठेक्यावर दांडिया खेळताना दिसत आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News