धरण फोडणारा माझा खेकडा मोठा गं बया...

प्रतिक कांबळे,पवई
Sunday, 7 July 2019

औदाच्या मोसमात जातो शेकडा गं बया...

अन् धरण फोडणारा माझा खेकडा गं बया...

करतोय नेता, बड्याबड्या बाता

स्वतःच्या नावानं खोलतोय खाता

खात्याची रक्कम, झालीया भक्कम

पुढारी करतात खेकड्याच्या गप्पा 

औदाच्या मोसमात जातो शेकडा गं बया...

अन् धरण फोडणारा माझा खेकडा गं बया...

करतोय नेता, बड्याबड्या बाता

स्वतःच्या नावानं खोलतोय खाता

खात्याची रक्कम, झालीया भक्कम

पुढारी करतात खेकड्याच्या गप्पा 

म्हणून खेकड्याला अटकेत देतो गं बया...

अन् धरण फोडणारा खेकडा गं बया...

झाली नेत्यांची गोची, खेकड्याची नांगी

जनता करते मदतीची मागणी

धरण फुटले, गाव सारे उठले

खेकड्याच्या नावाचे राजकारण पेटले

आता खेकडाच पुढारी झाला गं बया.....

अन् धरण फोडणारा खेकडा गं बया....

हातात बेड्या, मारतोय फेऱ्या 

राजकारणी साला मारतोय उड्या

उंदीर झाला, घुशी झाल्या

खेकड्याच्या जातीला साला उत आला

कोर्टात खेकड्यावर खटला चालेल गं बया....

अन् धरण फोडणार खेकडा गं बया....
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News