तब्बल ६ महिने ह्या चित्रपटामुळे निल मुकेश यांनी घेतली होती मुलाशी फरकत 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 15 January 2020
  • अभेनेते निल नितीन मुकेश यांनी नुकताच एक किस्सा प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितला आहे.
  • त्यांनी "जॉनी गद्दार "ह्या चित्रपटामध्ये साकारलेली  भूमिका ही एक चांगलीच चर्चेचा बिषय बनली होती. बऱ्याच जणांनी ह्या भूमिकेबद्दल त्याचे कौतुकही केले मात्र नील नितीन मुकेशनी पार पाडलेली खलनायकाची भूमिका मात्र त्याच्या  वडिलांच्या पचनी पडलेली नव्हती  त्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केलेली होती.

मुंबई  : अभिनेते निल नितीन मुकेश हे बॉलिवूडमधील कायम चर्चेत असलेल नाव.घरामध्ये संगीताचा वारसा असतानासुद्धा त्यांनी निवडलेले क्षेत्र हे सर्वांनाच अचंबित करून सोडणारे होते. बऱ्याच जणांना शंका होती कि निल नितीन मुकेश हे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपले अस्तित्व प्रस्थापित करू  शकतील कि नाही परंतु या सर्व चर्चेला फाटा देत निल नितीन  मुकेश यांनी आपली आज एक वेगळीच अशी प्रतिमा निर्माण केली आहे.

तो  सध्या चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले कलाकार म्हणून ओळखला  जातो .परंतु हा प्रवास जितका अविस्मरणीय होता तितकाच खडतर देखील होता. निल च्या घरातून सुद्धा काही वेळेस त्याच्या कामांवर आक्षेप घेण्यात आला,पराकोटीचं भांडण झाले. तीव्र उद्रेकाला समोर जावं लागलं याबाबतचे अनेक किस्से निल ऑफ द रेकॉर्ड सांगतो असे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजते.

अभेनेते निल नितीन मुकेश यांनी नुकताच एक किस्सा प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितला आहे. त्यांनी "जॉनी गद्दार "ह्या चित्रपटामध्ये साकारलेली  भूमिका ही एक चांगलीच चर्चेचा बिषय बनली होती. बऱ्याच जणांनी ह्या भूमिकेबद्दल त्याचे कौतुकही केले मात्र नील नितीन मुकेशनी पार पाडलेली खलनायकाची भूमिका मात्र त्याच्या  वडिलांच्या पचनी पडलेली नव्हती  त्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केलेली होती.

त्यामुळे वडिलांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले होते. हा राग एवढा भयंकर होता कि नितीन मुकेश हे आपल्या मुलावर तब्बल ६  महिने बोलत नव्हते मात्र कालांतराने दोघांमध्ये असलेला अबोला मिटला 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News