बापरे ! मागील ५ वर्षात १२०० हून अधिक अल्पवयीन बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 August 2020
  • नागपूर शहरातील खळबळ जनक घटना समोर आली आहे.
  • नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात मुल आणि मुली बेपत्ता होण्याच्या तक्रारी आहेत.
  • नागपूर शहरातून मागील पाच वर्षांत १ हजार २३३ अल्पवयीन बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.

नागपूर :-  नागपूर शहरातील खळबळ जनक घटना समोर आली आहे. नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात मुल आणि मुली बेपत्ता होण्याच्या तक्रारी आहेत. नागपूर शहरातून मागील पाच वर्षांत १ हजार २३३ अल्पवयीन बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. परंतु यातील १ हजार १२७ जण परत आले. पम १०६ जणांचा काहीच पत्ता लागलेला नाही. त्यात ७७ मुलांचा देखील समावेश आहे. मानवी तस्करीतून हे प्रकार घडले असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. माहिती अधिकारातील माहितीतून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

बाल अधिकार अधिनियम २०१५ च्या कलम १०७ अंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यात बाल पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती अनिवार्य आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात मानव तस्करी प्रतिबंधक पथकदेखील असणे गरजेचे आहे. मात्र मागील पाच वर्षांतील आकडे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. आरटीआय कार्यकर्ते आरिफ शेख पटेल यांनी माहिती अधिकारांतर्गत ही माहिती पोलिसांना मागितली होती. प्राप्त माहितीनुसार, जानेवारी २०१५ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयांतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यात १ हजार २३३ अल्पवयीन गायब झाले. परंतु यात ९२१ मुलींचा समावेश होता. २८३ मुले आणि ८४४ मुलींना पोलिसांनी शोधून काढले. मात्र ७७ मुली आणि २९ मुलांचा काहीच पत्ता लागलेला नाही.

दोन महिन्यातच ६८ गायब २०२० मध्ये जानेवारी आणि फेब्रुवारीतील आकडेवारी चिंता वाढविणारी आहे. या दोन महिन्यांत ६८ अल्पवयीन गायब झाले. यातील २६ जण अद्यापही बेपत्ताच आहेत. यात १८ मुली आणि ८ मुलांचा समावेश आहे. बाल अधिकार कल्याण अंतर्गत असलेल्या कायद्यात अनेक तरतुदी आहेत. परंतु त्यांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नाही. ही प्रकरणे नियंत्रित करणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी समुपदेशक अंजली विटणकर यांनी व्यक्त केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News