‘एचआयव्ही’ जनजागृतीसाठी सायकलवारी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 June 2019

परभणी : एचआयव्ही बाधितांचे मूलभूत हक्क शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन आणि आता स्वयंरोजगार व प्रशिक्षण या मुद्यावर सायकलिंगच्या माध्यमातून जनसमान्यांशी संवादातून जनजागृती व्हावी या उद्देशाने परभणी येथील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक व आकाश गीते हे ता.२९,३० जुन दरम्यान, पुणे-आळंदी-पंढरपूर  असा ३०० किलोमिटरचा सायकल प्रवास करणार आहेत. 

यंदा डॉ.चांडक यांची सहावी वारी असून ता.२९ जून रोजी पुणे रेल्वे स्थानक येथून सायकलिंग करत आळंदी, पुणे, खराडी, हडपसर, उरली कांचन मार्गे  चौफुला, पाटस मार्गे भिगवण येथे भिगवण सायकल क्लब, रोटरी क्लबच्या सदस्यांना मार्गदर्शन करणार आहेत. वाटेत ठिकठिकाणी भेटणाऱ्या पालखीमधून देखील एचआयव्ही एड्स व पर्यावरण विषयी जनजागृती करणार आहेत. ता. ३० जून रोजी भिगवणहुन निघून  सायकलिंग करत इंदापूर, अकलूज, वेळापुरमार्गे पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचे दर्शन घेऊन ८५ एड्सग्रस्त विद्यार्थांचे पालवी प्रकल्प येथे भेट देऊन व त्यांच्या पुनर्वसन साठी मदत करतील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News