आनंदचा पराभवाचा फेरा संपेना

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 27 July 2020
  • चार लढतीत आनंदच्या चुकांचा फायदा प्रतिस्पर्ध्यांनी घेतल्यावर आनंदला ही संधी लाभली, पण त्याचे पूर्ण विजयात रूपांतर करण्यात त्याला अपयश आले.
  • त्यामुळे विश्वनाथन आनंदचा लींजडस्‌ ऑफ चेसमधील पराभवाचा फेरा संपला नाही.

मुंबई :- चार लढतीत आनंदच्या चुकांचा फायदा प्रतिस्पर्ध्यांनी घेतल्यावर आनंदला ही संधी लाभली, पण त्याचे पूर्ण विजयात रूपांतर करण्यात त्याला अपयश आले. त्यामुळे विश्वनाथन आनंदचा लींजडस्‌ ऑफ चेसमधील पराभवाचा फेरा संपला नाही.

पीटर लेकोविरुद्ध पहिला डाव जिंकल्यावर आनंदने चौथा डाव गमावला. त्यामुळे लढतीचा निर्णय आर्मगेदॉन डावावर गेला. आनंदने या वेळीही चौथ्या फेरीत अनिश गिरीविरुद्ध केलेली चूक केली. या प्रकारच्या लढतीत जास्त वेगवान चाली आवश्‍यक असतात. आनंदची यात खरे तर खासियत समजली जाते, पण पुन्हा आनंदने चालींसाठी जास्त वेळ घेतला आणि त्याला पराभव पत्करावा लागला. "आर्मगेदॉनमध्ये जास्त विचार करायचा नसतो, त्यात चालींचा वेग वाढवत दडपण आणायचे असते," अशी टिप्पणी पीटर लेकोने केली.

पीटर लेकोविरुद्धच्या पहिल्या डावात आनंदची बाजू सुरुवातीपासून कमकुवत होती. त्याने डाव लांबवत नेला होता. विजय स्पष्ट दिसत असतानाही लेकोकडून चूक झाली. आनंदने याचा फायदा घेतला. दुसऱ्या डावात आनंदला भक्कम सुरुवातीचा फायदा घेता आला नाही. या वेळी त्याने मोक्‍याच्या वेळी प्यादी कार्यरत केली नसल्याचा त्याला फटका बसला. तिसरा डाव बरोबरीत सुटला आणि चौथ्या डावात लेकोने सुरुवातीपासून पकड घट्ट करीत बाजी मारली. आर्मगेदॉनने डाव गमावल्याने अखेर आनंद 2-3 असा पराजित झाला.
 

पहिल्या डावात मी विजयाची संधी गमावली; पण त्यानंतर मला संधी निर्माण झाली. त्यातील एकही मी दवडली नाही.
- पीटर लेको

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News