#cwc2019 - पाहा सगळी आयसीसी आहे, विराट कोहलीच्या प्रेमात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एका कृतीने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्विटरवरून भारतीय कर्णधार विराट कोहली एका सिंहासनावर बसलेले छायाचित्र पोस्ट केले आहे.

सिंहासनावर बसलेल्या कोहलीच्या डोक्‍यावर राजाचा मुकुट असून, एका हातात बॅट आणि दुसऱ्या हातात चेंडू आहे. दहा देशांचे संघ एका स्पर्धेत जिवाची बाजी लावून खेळत असताना एकाच संघाच्या कर्णधाराचे असे छायाचित्र प्रदर्शित केल्यामुळे चुकीचा संदेश समोर येतो, असे क्रिकेटतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

#TeamIndia#CWC19 pic.twitter.com/cGY12LaV3H

— ICC (@ICC) June 5, 2019

आयसीसीच्या या कृतीचा चाहत्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘असे छायाचित्र प्रसिद्ध करून, आयसीसीला नेमके काय सिद्ध करायचे आहे, हे समजत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर दुसऱ्या एकाने आता आयसीसीदेखील भारतीय संघाचे चाहते बनले आहेत,’ अशी टिप्पणी केली आहे. अन्य देशांच्या संघांनी ही कृती अजून मनावर घेतलेली नाही. त्यामुळे ‘आयसीसी’नेदेखील जाहिराती किंवा निर्णय घेताना पूर्ण विचार करावा, असेदेखील चाहत्यांचे म्हणणे पडले आहे. आयसीसीला विजेता ठरवायची इतकी घाई झाली की काय, अशीदेखील प्रतिक्रिया उमटली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News