#cwc_2019 - विराट सेनेचा उत्साह वाढावा म्हणून वापरली जातेय 'ही' स्टाईल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

या वर्षी क्रिकेटच्या पंढरी मध्ये विश्वचषक खेळला जातोय. तो खेळला जातोय तेही दर वेळी पेक्षा वेगळ्या पद्धतीने. भारतीय क्रिकेट रसिक हे विराट सेनेचे प्रचंड मोठे चाहते आहे. याचे अनुभव खूप वेळेस आलेले आहेत. आपल्या टीमला केव्हा डोक्यावर घेऊन फ़िरतील याचा नियम नाही. विश्व चषकामध्ये वेगळे पण यावे म्हणून स्टार स्पोर्ट्सने एक आगळा वेगळा उपक्रमाची सुरुवात केली आहे. सध्या लंडनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये भारतीय क्रिकेटपटूंनी चांगली कामगिरी करावी व  भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढावा यासाठी त्यांना त्यांच्या घरच्या मैदानावरची, घराजवळची किंवा शाळेच्या मैदानावरची माती पाठवली जात आहे.

या वर्षी क्रिकेटच्या पंढरी मध्ये विश्वचषक खेळला जातोय. तो खेळला जातोय तेही दर वेळी पेक्षा वेगळ्या पद्धतीने. भारतीय क्रिकेट रसिक हे विराट सेनेचे प्रचंड मोठे चाहते आहे. याचे अनुभव खूप वेळेस आलेले आहेत. आपल्या टीमला केव्हा डोक्यावर घेऊन फ़िरतील याचा नियम नाही. विश्व चषकामध्ये वेगळे पण यावे म्हणून स्टार स्पोर्ट्सने एक आगळा वेगळा उपक्रमाची सुरुवात केली आहे. सध्या लंडनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये भारतीय क्रिकेटपटूंनी चांगली कामगिरी करावी व  भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढावा यासाठी त्यांना त्यांच्या घरच्या मैदानावरची, घराजवळची किंवा शाळेच्या मैदानावरची माती पाठवली जात आहे. अशी माती पाठवून प्रेरणा देण्याची बहुदा पहिलीच वेळ असेल.

स्टार स्पोर्ट्सने आपल्या या उपक्रमांचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. यामध्ये प्रत्येक खेळाडूच्या नावाने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. सर्वात आधी भारताचा कप्तान विराट कोहली याला शुभेच्छा देताना त्याच्या उत्तम नगरमधल्या विशार भारती पब्लिक स्कूलमधल्या मैदानावरची माती पाठवण्यात अली आहे.

त्यामध्ये विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याच्या अगोदर विराट पर्यंत ही माती पोचली सुद्धा. 

भारताचा माजी कप्तान महेंद्रसिंह धोनी याला त्याच्या शाळेतल्या मैदानातली माती पाठवण्यात आली आहे. हे तेच मैदान आहे, जिथे धोनीने त्याचा प्रसिद्ध हेलिकॉप्टर शॉट शोधून काढला व त्याचा सराव करताना माही कायम मग्न असायचा.

सध्याचा जगातला अव्वल क्रमांकाचा बॉलर म्हणून बुमरा कडे पाहिले जाते. आपल्या वेगळ्या शैली मुळे तो सर्वांच्या मनात घर करून बसला आहे. तसेच भारताच्या बॉलिंगची त्याच्या खांद्यावर आहे. त्याला देखील त्याच्या शाळेतल्या मैदानावरची माती पाठवण्यात येत आहे. याच मैदानावर जसप्रीत बुमराहने त्याचे बॉलिंगमधले पहिले धडे गिरवले होते.

भारतीय बॅटिंग लाइनअपममध्ये मधल्या फळीत खेळणारा धडाकेबाज ऑलराऊंडर हार्दिक पंड्याला त्याच्या घरच्या मैदानावरची माती पाठवली जात आहे.

दबंग खान म्हणून प्रसिद्ध असणारा सलमान खान यांच्या सुलतान सिनेमामध्ये असा एक क्षण दाखवला आहे.

सलमान खानच्या सुलतान चित्रपटामध्ये टुर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी जातो. जाताना सुलतान त्याच्या गावातल्या आखाड्यातली माती घेऊन जातो आणि शेवटच्या मॅचच्या आधी ती माती हातावर चोळतो. हे केल्यामुळे त्याच्या अंगात वेगळी शक्ति येते अस म्हणावं लागेल. तसच काहीसा क्रिकेटपटुंबद्दल व्हावे आणि आपल्या मातीची आठवण कायम राहावी व विश्वचषक जिंकण्यासाठी मनोबल वाढावे असाच काहीसा प्रयत्न स्टार स्पोर्ट्स  ने केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News