#cwc_2019 - ऑस्ट्रेलियाच्या सरावाच्या वेळी अपघात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019

लंडन - ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा ओव्हल मैदानावर सराव चालू असताना एक अपघात घडला. नेटमध्ये सरावाकरता काही हौशी गोलंदाज येतात. त्यातील एक गोलंदाज डेव्हिड वॉर्नरला गोलंदाजी करत होता. पुढ्यात पडलेला चेंडू वॉर्नरने ताकदीने फटकावला. फटका जमिनीलगत नव्हता तर हवेत होता. गोलंदाजाला अंदाज आला नाही आणि चेंडू त्या गोलंदाजाच्या डोक्‍यावर आदळला.

चेंडू डोक्याला लागताच धपकन तो गोलंदाज जमिनीवर कोसळलेला पाहून वॉर्नर फार घाबरला. क्षणार्धात वॉर्नरसह ऑस्ट्रेलियन संघातील इतर काही खेळाडू त्या गोलंदाजाला मदत करायला धावले. शेजारीच सराव करणारा स्टीव्ह स्मिथ थांबला.

फिल ह्युजला मैदानात दुखापत झाली त्यावेळी वॉर्नरच होता. डोक्‍याला आघात झाला म्हणल्यावर वॉर्नरला तीच भयानक आठवण परत झाली. आघात प्रचंड जोराचा असल्याने त्या गोलंदाजाला अखेर स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेले गेले. हॉस्पिटलमधे नेऊन तपासणी केल्यावर सुदैवाने खूप मोठी दुखापत नसल्याचे जाहीर केल्यावर वॉर्नरने सुटकेचे नि:श्वास टाकला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News