विराट सेनेच्या विजयाचा ट्विटरवर जल्लोष

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019
  • भारतीय संघाने विश्वकरंडक मोहिमेला सुरवात होताच पहिल्याच सामन्यात परिपूर्ण प्रदर्शन करत दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली
  • या विजयानंतर ट्विटरवर टीम इंडियावर कौतुकचा वर्षाव होत आहे.

साउदम्पटन - भारतीय संघाने विश्वकरंडक मोहिमेला सुरवात होताच पहिल्याच सामन्यात परिपूर्ण प्रदर्शन करत दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. प्रथम गोलंदाजी करताना भारताचे सर्व गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. सुरवातीलाच जसप्रित बुमराने आफ्रिकेला दणके दिले. त्यानंतर मधल्या षटकात युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादवने त्यांना मोठ्या भागीदारी करण्यापासून रोखून धरले तर अखेरच्या षटकात भुवनेश्वर कुमारने मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. 228 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर रोहित र्माने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने आफ्रिकेवर सहज विजय मिळवला. या विजयानंतर ट्विटरवर टीम इंडियावर कौतुकचा वर्षाव होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News