कस्टर्ड क्रिम बिस्कीट्स

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 31 July 2020
  • कस्टर्ड क्रिम बिस्किट् ही खास ब्रिटीश डेलिकसी आहे.
  • अशी बिस्कीट किंवा कुकीज आपण अनेकदा बाजारातून आणणच पसंत करतो.
  • परंतु सध्याच्या परिस्थितीत आपल्याला थोडा निवांत वेळ मिळाला आहे, तेव्हा मी खास तुमच्याकरीता सोप्या पद्धतीची कस्टर्ड क्रिम बिस्किटांची रेसिपी घेऊन आली आहे.

कस्टर्ड क्रिम बिस्किट् ही खास ब्रिटीश डेलिकसी आहे. अशी बिस्कीट किंवा कुकीज आपण अनेकदा बाजारातून आणणच पसंत करतो. परंतु सध्याच्या परिस्थितीत आपल्याला थोडा निवांत वेळ मिळाला आहे, तेव्हा मी खास तुमच्याकरीता सोप्या पद्धतीची कस्टर्ड क्रिम बिस्किटांची रेसिपी घेऊन आली आहे. ही बिस्कीटे एकदम खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी होतात तेव्हा ही रेसिपी घरी नक्की बनवून पाहा आणि आपल्या प्रियजनांना खाऊ घाला. 

साहित्य :-

बिस्कीटांसाठी :-

 

  • १.५ कप मैदा
  • ०.५ कप कस्टर्ड पावडर
  • १.५ स्टीक बटर  
  • ०.५ कप पिठीसाखर
  • ०.२५ चमचा बेकींग सोडा 

 

 क्रीमसाठी :-

 

  • ०.२५ स्टीक बटर
  • ०.५  पिठीसाखर
  • ५ ते ६ थेंब व्हॅनिला इसेन्स

 

कृती :-

सर्व प्रथम मैदा, कस्टर्ड पावडर आणि बेकींग सोडा चाळणीतून चाळून घ्यावा. ह्यामुळे मैद्यात हवा जाऊन बिस्कीटे हलकी होतात. बटर आणि पिठीसाखर हँडमिक्सरने एकत्र करून त्याची गुळगुळीत पेस्ट बनवून घ्यावी. वरची दोन्ही मिश्रण एकत्र करून त्याच बॅटर बनवावं. हे केकच्या बॅटर इतकं पातळ होत नाही. पोळ्यांच्या कणकेपेक्षाही घट्ट असतं.

बॅटरचे छोटे गोळे करून ते बेकींग ट्रेवर दाबून चपट करून त्याला बिस्कीटांचा आकार द्यायचा आहे. त्यावर काट्याने रेघा ओढून थोडसं डेकोरेशन केलं तरी हरकत नाही. बिस्कीटे कुकीकटर वापरून पण करू शकता. ५.३५० डिफॅ तापमानाला ओव्हनमध्ये १५ ते २० मिनीटे बिस्कीटे बेक करून घ्यावीत. तळाच्या बाजूने रंग बदलायला लागल्यावर बिस्कीट झाली असे समजावे. वरून थोडसे ओल लागले तरी गार झाल्यावर ते नीट होतात.

बिस्कीटे बेक होत असताना एकीकडे बटर,  साखर आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र फेटून त्याचे क्रीम बनवावे. बेक केलेली बिस्कीटे जरा निवल्यावर दोन बिस्किटांच्यामध्ये क्रिमचा थर लावून एकमेकांवर चिकटवून ठेवावीत. अगदी बाजारात मिळतात तशी कस्टर्ड क्रिम बिस्कीटे तयार होतात.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News