सध्या तरी बॉलीवूडमध्ये पदार्पण नाही

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Tuesday, 23 April 2019

न्यासा हिंदी चित्रपटांमध्ये काम करणार का? या प्रश्‍नावर काजोल-अजयने मौन कायम राखलं होतं. पण आता काजोलने याबाबत खुलासा केला आहे. काजोल म्हणते, ‘न्यासा फक्त १६ वर्षांची आहे. सध्यातरी ती तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत आहे.

बॉलीवूडचे स्टारकिड्‌स सध्या एकापेक्षा एक बड्या हिंदी चित्रपटांमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. अशातच काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासाही बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगताहेत. 
 

न्यासा काजोलबरोबर अनेक बॉलीवूड पार्टींनाही हजेरी लावते. न्यासा हिंदी चित्रपटांमध्ये काम करणार का? या प्रश्‍नावर काजोल-अजयने मौन कायम राखलं होतं. पण आता काजोलने याबाबत खुलासा केला आहे. काजोल म्हणते, ‘न्यासा फक्त १६ वर्षांची आहे. सध्यातरी ती तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत आहे. शिक्षणानंतरच ती चित्रपटांत काम करणार की नाही याचा विचार आम्ही करू’. एकूणच काय तर न्यासाच्या बॉलीवूड पदार्पणाच्या चर्चांना आता फुलस्टॉप लागला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News