संचारबंदी असे पर्यत एकत्रित सराव शिबिर बंद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 19 May 2020

भारतीय क्रिकेट मंडळ राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास करणार आहे.

नवी दिल्ली : क्रिकेटपटूंच्या कौशल्यपूर्ण सरावास सुरुवात होईल, याकडे संघटनांनी लक्ष द्यावे, अशी सूचना भारतीय क्रिकेट मंडळाने केली आहे. प्रवासाचे निर्बंध असेपर्यंत एकत्रित सराव शिबिर सुरू करणे अशक्‍य आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वाची दखल भारतीय मंडळाने घेतली आहे. हवाई प्रवासावरील निर्बंध तसेच 31 मेपर्यंत देशात फिरण्यावर असलेली मनाई यामुळे करारबद्ध खेळाडूंच्या प्रशिक्षणाबाबत निर्णय घेण्याबद्दल आम्ही प्रतीक्षा करणार आहोत, असे मंडळाच्या पत्रकात म्हटले आहे.

भारतीय क्रिकेट मंडळ राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास करणार आहे. त्यानंतर राज्य संघटनांबरोबर चर्चा करून स्थानिक स्तरावरील कौशल्यपूर्ण शिबिरास सुरुवात होईल, असे मंडळाचे खजिनदार धुमळ यांनी सांगितले. हा सराव सुरू करताना खेळाडू तसेच मार्गदर्शकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असेही मंडळाने सांगितले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News