आजारपणात उपायकारक फिरनी; अशीपद्धतीने करा तयार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 7 August 2019
  • चांगल्या प्रकारे प्रथिने मिळतात
  •  थंड फिरनी देताना वरून परत बदाम काप टाकावे
  • सतत दूध चमच्याने हलवत राहा

साहित्य

-बासमती तांदूळ- पाव कप
-दूध- एक लिटर
-पिस्ता- ८ ते १०
-साखर किंवा खडीसाखर- एक कप
-बदाम- १५ ते २०
-वेलची- ४ ते ५
 -केशर- १० ते १५ तंतू
 -तूप- १ चमचा

कृती
तांदूळ दोन ते तीन वेळा धुऊन घ्या आणि सुक्या कापडावर पसरवून सुकवून घ्यावा. सुकल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर बाजूला दूध एका पातेल्यात गरम करण्यास ठेऊन दूध गरम झाल्यानंतर एका छोटय़ा वाटीत थोडे दूध घेऊन केशर त्यात भिजवावे. बारीक केलेला तांदूळ तुपात भाजून उकळलेल्या दुधात मिसळल्यानंतर मंद आचेवर शिजवून घ्यावे त्यासोबतच सतत दूध चमच्याने हलवत राहा नंतर त्यात साखर मिसळावी. 
साखर मिसळल्यानंतर गरम पाण्यात बदाम थोडा वेळ भिजवून साल काढून मग त्याचे काप केल्यानंतर पिस्ताचेही काप करून वेलची बारीक करून खीर होत आल्यानंतर बदाम, पिस्ता आणि वेलची पूड टाकून 5 ते 6 मिनिटे उकऴून घेऊन सर्वात शेवटी केशर असलेले दूध व आवश्यकतेनुसार गुलाबपाणी मिसऴून गॅस बंद करून थंड होऊ द्दावे.
 थंड फिरनी देताना वरून परत बदाम काप टाकावे.

वैशिष्टय़े :
- लहान मुले, अतिकृश, गर्भवती, स्तनपान करणाऱ्या माता, तापानंतर अशक्तपणा असणाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त
- चांगल्या प्रकारे प्रथिने मिळतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News