थायलंडमध्ये विकसित चाऱ्याची भारतात लागवड; लॉकडाऊनमध्ये १५ लाखांचा चारा विकला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 31 August 2020

थायलंडमध्ये विकसित चाऱ्याची भारतात लागवड; लॉकडाऊनमध्ये १५ लाखांचा चारा विकला

थायलंडमध्ये विकसित चाऱ्याची भारतात लागवड; लॉकडाऊनमध्ये १५ लाखांचा चारा विकला

शिर्डी - अनेकजण शेतात नवीन प्रयोग करत असतात, काहींना यश येतं, काहीजण पुन्हा-पुन्हा ते प्रयत्न करून यशस्वी होतात. असाच प्रयोग करताना यशस्वी झाले आहेत सोमेश्वर लवांडे बारावीपर्यंतचं शिक्षण, घरची एक एकर वडिलोपार्जित जमीन, पण या शेतक-याने चारा उद्योगात भरारी घेतली आहे. त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांनाही शाश्वत उत्पन्न मिळवून दिलं आहे. नेवासा तालुक्यातील फत्तेपुर गावातील सोमेश्वर यांनी मागील चार वर्षे आपल्या शेतात प्रयोग केला. परंतु चौथ्या वर्षी त्यांच्या प्रयोगाला यश आलं असं म्हणायला हरकत नाही. थायलंडमधील विकसित चारा पीक त्यांनी भारतात घेतलं. ‘4G बुलेट सुपर नेपियर’असं त्या चारा पिकाचं नाव आहे. सोमेश्वर यांनी लॉकडाऊनच्या काळात त्याने लाखो रुपयांचा नफा कमावला.

सोमेश्वर यांच्या गावाची लोकसंख्या १४०० च्या सुमारास आहे. तसेच त्या गावातील सोमेश्वर हे अल्पभुधारक शेतकरी आहेत. त्यांनी थायलंडमध्ये विकसित केलेल्या फोर-जी सुपर नेपियर जातीच्या चाऱ्याची लागवड केली. कमी वेळेत अधिक उत्पन्न उत्पादन असं दुधासाठी सकस असलेला हा चारा शेतक-यांची पसंतीला उतरला आहे.

अनेक प्रयत्न केल्यानंतर हा त्यांचा प्रयोग यशस्वी झाला आहे. लॉकडाउनच्या काळात लाखोंचं उत्पन्न मिळवत त्यांनी शेतक-यांना दिलासा दिला आहे. सोमेश्वर यांनी लॉकडाऊनमध्ये 15 लाखांची उलाढाल चारा उद्योगातून झाली असून चार लाखांचा निव्वळ नफा केवळ 15 गुंठ्यात मिळवला.

प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्याने अनेकजण मिळालेल्या मोकळेवेळेत व्हिडीओ पाहत बसतात. त्याचपध्दतीने सोमेश्र्वर सुध्दा शेतीच्या संदर्भातले व्हिडिओ पाहत होते. शेतात कसे प्रयोग केले जातात. याचे त्यांनी अनेक प्रयोग पाहिल्यानंतर त्यांनी शेतात ‘4G बुलेट सुपर नेपियर’ लागवड करण्याचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी तीनवर्षे या पिकाचा अभ्यास केला.

दुध उत्पादकांना अनेकदा महागडा चारा खरेदी कारावा लागायचा, त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी शेतकऱ्यांची अवस्था होते. अशा परिस्थितीत ‘4G बुलेट सुपर नेपियर’हे गवत धंद्यासाठी वरदान ठरत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बियांच्यासाठी सोमेश्र्वर यांच्याशी संपर्क साधत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News