नागरी सेवा पुर्व परीक्षेचा सिसॉट पेपर रद्द होणार?; सरकारचे स्पष्टीकरण 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 17 September 2020

नागरी सेवा पुर्व परीक्षेचा (CSAT) पेपर एक आणि पेपर दोन रद्द होणार का? तसेच मुलाखतीच्या जागी मनासशास्त्रीस परीक्षा घेतली जाणार का? असा प्रश्न खासदारांनी उपस्थित केला, त्यावर सरकारने स्पष्टीकरण दिले. 

 नवी दिल्ली: देशातील सर्वात कठीण युपीएससी परीक्षेचा पॉटर्न बदणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती, त्यावर संसदेच्या वरीष्ठ सभागृहात प्रश्न उपस्थित करण्यात आला. नागरी सेवा पुर्व परीक्षेचा (CSAT) पेपर एक आणि पेपर दोन रद्द होणार का? तसेतच मुलाखतीच्या जागी मनासशास्त्रीस परीक्षा घेतली जाणार का? असा प्रश्न खासदारांनी उपस्थित केला, त्यावर सरकारने स्पष्टीकरण दिले. 

गुरुवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लोकप्रतिनिधींची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी सिव्हिल सर्व्हिस अॅप्टिट्यूड टेस्ट (CSAT) परीक्षेत सरकार काही बदल करणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर केंद्रीय कामगार मंत्री जितेंद्र सिंग यांनी उत्तर दिले. नागरी सेवा पुर्व परीक्षेचा (CSAT) पेपरमध्ये बदल करण्याचा सध्या तरी सरकारचा कोणताही विचार नाही, तसेच मुलाखतीच्या जागी मनसशास्त्रीय परीक्षा घेण्याचा प्रस्तार नाही, त्यामुळे जुण्याच पद्तीने युपीएससीची परीक्षा होणार आहे, असे मत मंत्री सिंग यांनी व्यक्त केले. 

कशी आहे सीसॉट परीक्षा?

नागरी सेवा पुर्व परीक्षेत (CSAT) दोन पेपर सोडवावे लागतात. पहिला पेपर जनरल नॉलेजचा असतो तर दुसरा बुद्धीमतेचा असतो. त्याला सीसॉट म्हणतात. दोन्ही पेपरमध्ये पास होणे उमेदवारला आवश्यक असते. त्यानंतर मुख्य परीक्षा घेतली जाते. मुख्य परीक्षेनंतर मुलाखत द्यावी लागले. पुर्व, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यामधून जावे लागते.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News