इंग्लंडमधील क्रिकेट सामन्याला प्रेक्षकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 27 July 2020
 • कोरोना महामारीच्या आक्रमणानंतर क्रिकेट सामने सुरू होताना ते प्रेक्षकांविना सुरू झाले होते.
 • आता इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील अखेरची कसोटी निर्णायक अवस्थेत असतानाच क्रिकेट मैदानावर चाहत्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया इंग्लंडमधील स्थानिक सामन्याद्वारे सुरू झाली.

लंडन :- कोरोना महामारीच्या आक्रमणानंतर क्रिकेट सामने सुरू होताना ते प्रेक्षकांविना सुरू झाले होते. आता इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील अखेरची कसोटी निर्णायक अवस्थेत असतानाच क्रिकेट मैदानावर चाहत्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया इंग्लंडमधील स्थानिक सामन्याद्वारे सुरू झाली. सरे आणि मिडलसेक्‍स यांच्यातील लढतीस एक हजार प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला होता. अर्थातच त्यांना एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर बसवण्यात आले होते. त्यामुळे किया ओव्हल चाहत्यांना प्रवेश दिलेले इंग्लंडमधील पहिले स्टेडियमही ठरले. सरे आणि मिडलसेक्‍स यांच्यातील महोत्सवी सामना प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा प्रयोग करण्यासाठी करण्यात आला होता. त्यामुळे त्या वेळी नियमांचे कठोर पालनही झाले.

क्रिकेटने सुरुवात झाली असली, तरी इंग्लंडमधील खेळांसाठी शेफिल्डमधील जागतिक स्नूकर स्पर्धा तसेच गुडवूड हॉर्स रेसिंग फेस्टिवलच्या वेळी प्रेक्षकांना प्रवेश देण्याचे ठरले आहे, त्याची चाचणी करण्यात आली. ऑक्‍टोबरपासून क्रीडा स्पर्धेस असलेली चाहत्यांची उपस्थिती वाढू शकेल, याचे संकेत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी यापूर्वीच दिले आहेत.

प्रेक्षकांना प्रवेश देताना

 • २५  हजार ५०० क्षमतेच्या या स्टेडियममध्ये एक हजार चाहत्यांनाच प्रवेश
 • सामन्याची तिकिटे केवळ सरे आणि मिडलसेक्‍स क्‍लबच्या सदस्यांनाच
 • कुटुंबातील व्यक्तींना शेजारी बसण्यास परवानगी
 • अन्य चाहत्यांमध्ये तीन सीट सोडण्यात आल्या
 • प्रेक्षकांची व्यवस्था एक रांग सोडूनच
 • ठरवून दिलेल्या जागीच बसण्याची स्पष्ट सूचना
 • पॅव्हेलियन शेजारील स्टॅंडमध्ये खेळाडूंव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नव्हता.
 • प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ हॅंड सॅनिटायझर, स्टॅंडमध्येही सॅनिटायझर
 • प्रत्येकास हात निर्जंतुक केल्यावरच प्रवेश
 • खाद्य पदार्थाच्या खरेदीसाठी केवळ ऑनलाईन पेमेंटची सक्ती

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News