इचलकरंजीत कॉलेजच्या मुलांचा कांगावा... गर्दी खरेदीची

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

विद्यार्थी आणि चिमुकल्यांना शाळेचे वेध लागले आहेत. पुढील वर्गाची पुस्तके, वह्या आणि स्टेशनरी खरेदी करण्यासाठी बाजारात पालकांसह बच्चे कंपनी, विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली आहे.

इचलकरंजी - विद्यार्थी आणि चिमुकल्यांना शाळेचे वेध लागले आहेत. पुढील वर्गाची पुस्तके, वह्या आणि स्टेशनरी खरेदी करण्यासाठी बाजारात पालकांसह बच्चे कंपनी, विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली आहे. या वर्षी शालेय साहित्याच्या दरांमध्ये १० टक्‍क्‍यापर्यंत साधारण वाढ झाली आहे.शाळा सुरू होताना नवीन गणवेश, नवीन दप्तर, वह्या, पुस्तके, कंपास बॉक्‍स, टिफीन बॉक्‍स, ड्रॉईंग साहित्य खरेदीसाठी शहरात विद्यार्थ्यांची लगबग सुरू असते. नववी दहावीचे वर्ग उन्हाळी सुट्ट्यांच्या दरम्यानच काही शाळांमध्ये सुरू झालेले आहेत.

त्यामुळे त्या इयत्तांचे शालेय साहित्य घेण्याचा सिझन एप्रिल, मे असतो. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा १७ जूनपासून सुरू होणार आहे. लाखोंची उलाढाल जून महिन्यात शालेय साहित्यात होत असते. विविध कंपन्यांच्या वह्या, पुस्तके, रजिस्टर, अन्य साहित्य बाजारात आले असून मोठ्या आकाराच्या १०० पानी वह्या, १८० ते ३०० रुपये डझन, तर २०० पानी वह्या ३०० ते ६५० रुपये डझन आहेत.बाजारात टिफीन व कंपास बॉक्‍स वेगवेगळ्या डिझाईनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गेम्स असलेल्या कंपास बॉक्‍सला मुलांची अधिक पसंती मिळत आहे. बाजारात आलेले लाईटचे कंपास मुलांचे आकर्षण ठरत आहेत. कंपासच्या किमती ५० ते २०० रुपयापर्यंत आहेत.

कार्टुनचे चित्र व एअर टाईट लंच बॉक्‍सची अधिक विक्री होत आहे. बॉक्‍समधून अन्न सांडू नये, म्हणून एअर टाईट टिफीन बॉक्‍सला मागणी वाढत आहे. विविध कंपन्यांसह स्थानिक कंपन्यांच्या वह्या, त्यातही छोट्या वह्यांपेक्षा फुलस्केप वह्यांना अधिक मागणी आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दुसरी आणि अकरावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. पुस्तके लवकरच बाजारात उपलब्ध होतील. शहरात राजवाडा चौक, गांधी चौक, शाहू पुतळा व बऱ्याच शाळा, महाविद्यालयांजवळ शालेय साहित्याची दुकाने आहेत. शालेय साहित्याच्या खरेदीच्या पारंपरिक बाजारपेठेला ऑनलाईनला बाजारपेठेशी स्पर्धा करावी लागत आहे. सर्व शालेय साहित्य विक्री करणाऱ्या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. मात्र, खरेदीसाठी पालकांकडून पारंपरिक बाजारपेठेलाच प्राधान्य देण्यात येत आहे.

शाळा आणि गणवेश
बदलत्या काळानुसार खाकी गणवेश मागे पडला आहे. सध्या आधुनिक लुकच्या गणवेशांना शाळांकडून मागणी आहे. पालक गणवेशासाठी चांगल्या दर्जाच्या कापडासाठी आग्रही असतो. अनेक शाळाही ठराविक वर्षांनी गणवेश बदलतात. त्यामुळे गणवेशाची मागणी टिकून असल्याची दिसून येते. प्रत्येक शाळेचे गणवेश हे प्रामुख्याने ठराविक कापड दुकानांमध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे ठराविक दुकानातच पालकांचा गणवेशासाठी ओढा असतो.

शालेय साहित्याचे दर

वॉटर बॅग- १०  ते १०० रुपये
सॅक- १५० ते ६०० रुपये
दप्तरे - २०० ते ७०० रुपये
लहान वह्या- १८० रुपयांपासून (डझन)
मोठ्या वह्या- ३०० रुपयांपासून (डझन)
कंपासपोटी - ५० रुपयांपासून पुढे
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News