मालेगाव बाजारपेठेत क्रॉस कुर्त्याची धूम

योगेश बच्छाव
Friday, 18 October 2019
  • बटरफ्लाय प्लाझो ड्रेसचे तरुणींना आकर्षण

सोयगाव: दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर येथील बाजारपेठेत नवनवीन व आकर्षक डिझाइनचे कपडे उपलब्ध झाले आहेत. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच नवीन कपडे खरेदीचे वेध लागले आहेत. काही प्रमाणात खरेदीला सुरवात झाली आहे. दोन दिवसांनंतर शाळांना दिवाळीच्या सुट्या लागणार आहेत. त्यानंतर बच्चेकंपनींची खरेदीची धूम पाहायला मिळेल.

यंदा दिवाळीचे वातावरणही निवडणूकमय झाले आहे. बाजारात मोदी व क्रॉस कुर्त्याची धूम पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चेन्नई एक्‍स्प्रेस, लुटेरा, परिणिता या नाव्याच्या साड्या महिलांना आकर्षित करीत आहेत. लहान मुले व महिला खरेदीत आघाडीवर आहे. बाजाराला मंदीतून सावरण्याबरोबरच मोठी उलाढाल होण्यासाठी दिवाळी हातभार लावणार आहे. साड्यांमध्ये सिल्क, कॉटन, दुल्हन, सुपर नेट, प्रिंटेड वर्क, घागरा असे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. नेटच्या सिंथेटिक व बनारसी साड्यांना दुकानांत मोठी मागणी असून, त्यांच्या किमती २० टक्‍क्‍यांनी वाढल्या आहेत. साधारणतः एक ते ४० हजारांपर्यंत साड्यांच्या किमती आहेत.

पारंपरिक पैठणींनाही मागणी असल्याने त्यांचा दर वाढला आहे. दोन ते आठ वयोगटातील मुलांचे तयार कपडे ६०० ते १६०० रुपये, १० ते १२ वयोगटातील मुलांचे कपडे एक ते दोन हजारांपर्यंत तर लहानग्यांसाठी कुर्ता, जीन्स, सलवार, मोदी कुर्ता, नॅरो बॉटम, फॅन्सी टी-शर्ट उपलब्ध आहेत. तरुणींसाठी बटरफ्लाय प्लाझो ड्रेस, अनारकली, बोल बच्चन, अनारकली, घागरा, पंजाबी, जरी वर्क, जीन्स, कॉटन जीन्स, टॉप, कुर्ता यांना मागणी आहे. मुलींचे कपडे एक ते तीन हजारांपर्यंत उपलब्ध आहेत. २५ व २० ऑक्‍टोबरनंतर बहुसंख्य शाळांच्या सहामाही परीक्षा संपतील. त्यानंतर खरेदीला जोर येईल, असे दुकानदारांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News