अकोल्यातला हा क्रिकेटपटू खेळणार आयपीएल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 12 September 2020

अकोल्यातला हा क्रिकेटपटू खेळणार आयपीएल

अकोल्यातला हा क्रिकेटपटू खेळणार आयपीएल

क्रिकेट भारतात स्वातंत्र्य काळापासून खेळलं जात आहे, परंतु आत्तापर्यंत भारतीय संघाला अष्टपैलु खेळाडू हे अभावानेच मिळाले आहेत. कारण भारतात कित्येककाळ हा भरवशाचा फलंदाज किंवा गोलंदाजावरती घालवावा लागलेला आहे. आत्तापर्यंत भारताकडून कपिल देव हाच अष्टपैलू खेळाडू क्रिकेट जगताला दिला आहे. मधल्या काळात अजित आगरकर आणि इरफान पठान यांनी थोडीफार चाहत्यांची आशा निर्माण केली होती. परंतु त्यांना त्यात सातत्य ठेवता आले नाही. सध्या हार्दीक पांड्या जरी अष्टपैलू खेळ करीत असला तरी त्याला त्याच्या सुधारणा करण्यात बराच वेळ लागू शकतो.

आयपीएलमुळे नव्याचा उगम हा होत असतो, फक्त त्याला त्याचं वेगळेपण जपता आलं पाहिजे. गोलंदाजी करून शेवटी खेळायला येणा-या एका खेळाडूचा बोलबाला जास्त आहे. त्याचं वय २१ असून तो विदर्भाचा आहे. त्याचं नाव दर्शन नळकांडे आहे.

विदर्भातल्या अकोल्या शहरात जन्म घेतलेल्या दर्शन हा अत्यंत शांत स्वभावाचा खेळाडू आहे. तो घरातून बाहेर पडत नाही, कारण त्याला ऑनलाइन गेमचं प्रचंड वेड आहे. क्रिकेट आवडत असल्याने दर्शनने १२ व्या वर्षी नागपूरला क्रिकेट शिकण्यासाठी प्रवेश घेतला होता. त्याची गोलंदाजी चांगली असल्यामुळे त्याला १६ व्या वर्षी विदर्भातल्या संघात संधी मिळाली.

दर्शनची गोलंदाजी इतकी स्पीडने व्हायची की, त्यांच्या चेंडूला बॅटचा हलका धक्का लागला तरी चेंडू सीमारेषा पार करायचा. दर्शन विदर्भाच्या संघासाठी चांगली कामगिरी करीत असल्याचे क्रिकेट बोर्डाच्या लक्षात आले. २०१६-२०१७ मध्ये त्याने चांगलं प्रदर्शन बिहारमध्ये केलं होतं. त्यावेळी त्याने बडोद्या विरोधात शानदार शतक सुध्दा ठोकलं होतं.

२०१९ मध्ये त्याला आयपीएल संघात स्थान मिळाले होते. पण तिथे त्याला एकही सामना खेळता आला नाही. पण यंदाच्यावर्षी  पंजाब संघातून आपलं आयपीएलच्या कारर्कीला सुरूवात करणार आहे. अनिल कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली खेळणा-या दर्शनला यावर्शी किती संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News