'या' क्रिकेटरने सचिन तेंडुलकरला टाकले मागे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 25 June 2020

सचिन तेंडुलकरचे अब्जावधी चाहते असल्यामुळे काही त्याला क्रिकेटेश्वर म्हणतात, पण आता विस्डेन इंडियाने घेतलेल्या चाहत्यांच्या मतचाचणीत राहुल द्रविडने तेंडुलकरला मागे टाकले आहे.

नवी दिल्ली: सचिन तेंडुलकरचे अब्जावधी चाहते असल्यामुळे काही त्याला क्रिकेटेश्वर म्हणतात, पण आता विस्डेन इंडियाने घेतलेल्या चाहत्यांच्या मतचाचणीत राहुल द्रविडने तेंडुलकरला मागे टाकले आहे.

फेसबुकच्या माध्यमातून घेतलेल्या या जनमत चाचणीत द्रविडला 52 टक्के चाहत्यांनी पसंती दिली. त्यांना 11 हजार 400 मते मिळाली. तेंडुलकरला 48 टक्के चाहत्यांची पसंती लाभली. खरे तर या चाचणीची सांगता मंगळवारी होणार होती. त्या दिवशी द्रविडला 42 टक्के पसंती होती; पण अखेरच्या दिवशी द्रविडने चांगलीच जिगर दाखवली आणि तेंडुलकरला मागे टाकले. दरम्यान, तिसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धेत गावसकर यांनी विराट कोहलीस मागे टाकले.

विस्डेन इंडियाने सुरुवातीस सोळा भारतीय फलंदाजांची निवड केली होती. त्यातून अंतिम स्पर्धेसाठी राहुल द्रविड विरुद्ध सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर विरुद्ध विराट कोहली अशी स्पर्धा झाली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News