क्रिकेट संघाचे प्रशिक्षण या आठवड्यात सुरू 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 14 July 2020

क्रिकेट संघाचे प्रशिक्षण लिंकन येथील देशातील सर्वोच्च प्रशिक्षण केंद्रामध्ये या आठवड्यात सुरू करणार असल्याचे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे.

वेलिंग्टन : क्रिकेट संघाचे प्रशिक्षण लिंकन येथील देशातील सर्वोच्च प्रशिक्षण केंद्रामध्ये या आठवड्यात सुरू करणार असल्याचे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे. यामध्ये पुरुष आणि महिलांच्या संघातील सर्वोत्तम कामगिरी करणारे खेळाडू गटाने प्रशिक्षण सुरू करतील. तसेच आगामी हिवाळ्यापर्यंत सहा राष्ट्रीय शिबिरे घेण्यात येतील, असे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, पुरुषांचा संघ दक्षिण द्वीप आणि वेलिंग्टन येथे सराव करणार आहे; तर महिलांचा संघ कॅन्टरबरी हब येथील प्रशिक्षण शिबीर पूर्ण करून 19 जुलैला दुसरे शिबीर माऊंट मॉन्गुनूमधील बे ओव्हल येथे सुरू करणार आहे.

जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून न्यूझीलंडमध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. याव्यतिरिक्त न्यूझीलंडच्या महिला संघाने लिंकनमध्ये प्रशिक्षणाचे फोटो "आम्ही परतलो' असा मथळा टाकून अधिकृत ट्विटरवर पोस्ट केले आहेत. शिवाय देशात कोरोना विषाणूचा प्रभाव कमी असून दीड हजार लोकांना बाधा झाली होती, त्यातील 1400 लोक बरे झाले आहेत. त्यातील 22 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News