देशांतर्गत प्रवास जेव्हा सुरक्षित होईल तेव्हाच क्रिकेट सुरू: सौरव गांगुली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 10 July 2020

देशांतर्गत प्रवास जेव्हा सुरक्षित होईल तेव्हाच देशातील प्रथमश्रेणी क्रिकेट सुरू होईल, असे भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले. रणजी क्रिकेट सामन्यांसाठी खेळाडूंना प्रवास करावा लागतो, त्यासाठी हा प्रवास सुरक्षित होणे गरजेचे आहे, असे गांगुलींनी स्पष्ट केले.

मुंबई : देशांतर्गत प्रवास जेव्हा सुरक्षित होईल तेव्हाच देशातील प्रथमश्रेणी क्रिकेट सुरू होईल, असे भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले. रणजी क्रिकेट सामन्यांसाठी खेळाडूंना प्रवास करावा लागतो, त्यासाठी हा प्रवास सुरक्षित होणे गरजेचे आहे, असे गांगुलींनी स्पष्ट केले.

कोरोनाचा भारतीय क्रिकेटला बसलेला विळखा सुटलेला नाही त्यातच सध्या पावसाळा सुरू झाल्याने क्रिकेट बंदच आहे. ऑक्‍टोबर महिन्यात आयपीएल घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत; परंतु देशांतर्गत क्रिकेटसमोर मोठे प्रश्नचिन्ह आहे.

यंदाचा देशांतर्गत मोसम ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धेपासून सुरू होणे अपेक्षित आहे. त्यानंतर रणजी स्पर्धा, दुलीप करंडक आणि मुश्‍ताक अली राष्ट्रीय ट्‌वेन्टी-20 असा साधारणपणे स्पर्धेचा कालावधी असतो. गतमोसमाची सांगता करणारी इराणी करंडक स्पर्धा लॉकडाऊन सुरू झाल्याने रद्द झालेली आहे.

वरिष्ठ गटाची देशांतर्गत आणि ज्युनियर क्रिकेट भारतीय क्रिकेटचा पाया आहे. त्यांच्या स्पर्धा प्रामुख्याने ज्युनियर गटाच्या स्पर्धा आवश्‍यक आहेत, पण कोरोनाचे संकट दूर झाल्यावरच आपण या स्पर्धांचा विचार करू शकतो, असे गांगुली यांनी सांगितले.
याबाबत अधिक सविस्तरपणे बोलताना गांगुली म्हणतात, आपला देश फार मोठा आहे. रणजी क्रिकेटसंदर्भात बोलायचे तर दर आठवड्याला सामन्यांसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करावा लागतो, अशा परिस्थितीत प्रवासच सुरक्षित नसेल, तर स्पर्धा घेणे कठीण आहे.

ज्युनियर खेळाडूंना सांभाळायचेय
आपल्या देशात ज्युनियर खेळाडूंची प्रगती लक्षणीय आहे. देशात वयोगटाच्या भरपूर स्पर्धा होत असतात. त्यांचा सहभाग नवी पिढी घडवत असतो, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे, असे गांगुलींनी स्पष्ट केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News