प्रेक्षकाविना क्रिकेट सामने खेळले जाणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 22 April 2020
  • क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केनिन रॉबर्टस यांचे मत

सिडनी ः कोरोनामुळे सर्व क्रिकेट घडामोडी बंद असल्याने होत असलेले नुकसान भरून काढण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया भारताविरुद्धची नियोजित चार कसोटी सामन्यांची मालिका पाच सामन्यांची करण्याचा विचार करत आहे. भारताचा नियोजित ऑस्ट्रेलिया दौरा ऑक्‍टोबरमध्ये ट्‌वेन्टी-20 मालिकेतून सुरू होणार आहे आणि डिसेंबरमध्ये चार कसोटी सामन्यांनी संपणार आहे. या दरम्यान ट्‌वेन्टी-20 विश्वकरंडक स्पर्धेचाही समावेश आहे; परंतु कोरोनाच्या संकटामुळे सर्वच अनिश्‍चित आहे.

कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर होणारा एकूणच परिणाम पाहता हजारो कोटी डॉलरचे नुकसान होणार आहे, अशी भीती व्यक्त करून क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केनिन रॉबर्टस म्हणतात, जे काही शक्‍य होईल ते करायला हवे. स्टेडियममध्ये प्रेक्षक नसले, तरी सामने खेळवण्याच्या पर्यायावर विचार करायला हवा.

भारताविरुद्धची मालिका झाली, तर हा अतिरिक्त पाचवा कसोटी सामना एका शहरात प्रेक्षकांविना खेळवायला काहीच हरकत नाही. अजून पूर्ण कार्यक्रम नव्याने तयार करायला आमच्याकडे पुरेसा वेळ आहे, पण आम्ही कोणतीही शक्‍यता नाकारत नाही, असे रॉबर्टस्‌ म्हणाले.

प्रेशकांविना वर्ल्डकप?

होणारे संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया सर्व प्रयत्न करणार आहे. विश्वकरंडक ट्‌वेन्टी-20 स्पर्धा प्रेक्षकांविना खेळवण्याचा विचार करत आहे. कदाचित आम्हाला अपेक्षित आर्थिक फायदा मिळणार नाही, पण प्रक्षेपण हक्कातून मिळणाऱ्या रकमेचा वर्ल्डकपमध्ये खेळणाऱ्या इतर सर्व देशांना फायदा होईल ,असे मत रॉबर्टस यांनी मांडले. ऑस्ट्रेलियाचा देशांतर्गत मोसम संपलेला असला, तरी कोरोनामुळे त्यांनाही मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. म्हणूनच 80 टक्के प्रशासकीय स्टाफला
बिनपगारी रजेवर पाठवलेले आहे. ऑस्ट्रेलियाचे आर्थिक वर्ष 30 जूनला संपत असते.
सध्याचा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आम्हाला दोन कोटी डॉलरचा फटका बसलेला आहे आणि परिस्थिती अशीच कायम राहिली तर आणखी 2 कोटी डॉलरचे नुकसान होऊ शकेल, असे अंदाज रॉबर्टस यांनी व्यक्त केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News