क्रिकेटप्रेमींसाठी '८३' लवकरच भेटीला 

यिनबझ ऑनलाईन टीम
Wednesday, 20 February 2019

रणवीर सिंग स्टार ‘८३’ चित्रपटातील काही कलाकारांची नावे समोर आली आहेत. यातच आता आणखी एका कलाकाराची भर पडली आहे. अभिनेता साकिब सलीमही या चित्रपटात मोहिंदर अमरनाथची भूमिका साकारणार आहे.

१९८३ मध्ये भारतीय क्रिकेट टीमने वर्ल्ड कप जिंकला. यामध्ये मोहिंदर अमरनाथचा सिंहाचा वाटा आहे. वर्ल्ड कप फायनलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा मोहिंदरच होता. या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी साकिबची निवड झाली आहे.

विशेष म्हणजे दिल्लीमध्ये असताना साकिब एका राज्यस्तरीय क्रिकेट टीमचा भाग होता. त्यामुळे त्याला मुळातच क्रिकेटची प्रचंड आवड आहे. साकिबचे हे क्रिकेट कौशल्य आणि क्रिकेटप्रती त्याचे असणारे प्रेम ‘८३’साठी कामी येणार आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News