कौशल्य विकास विद्यापीठाची निर्मिती; समिती लवकरच अहवाल सादर करणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 February 2020

कौशल्य विद्यापीठ संदर्भात सकारने एक समिती स्थापन केली. सखोल अभ्यास करुन आपला आहवाल ही समिती सरकार समोर लवकरत मांडणार आहे.

भारत हा तरुणाईचा देशा आहे आणि तरुणाईवर देशाच भवितव्य आवलंबून आहे. मात्र, क्षमता असुनही अनेक तरुण कौशल्याच्या अभावामुळे बेरोजगार राहतात आशा तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रात कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्याच्या हालचाली सुरु आहेत. कौशल्य विद्यापीठ संदर्भात सकारने एक समिती स्थापन केली. सखोल अभ्यास करुन आपला आहवाल ही समिती सरकार समोर लवकरत मांडणार आहे. कौशल्य विद्यापीठ संदर्भात स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष रोजगार, उद्योजकता व कौशल्य विकास विभागाचे आयुक्त असणार आहेत. तर उच्च व तंत्र शिक्षण आणि विधी व न्याय विभागाचे अधिकारी समितीचे सदस्य असणार आहेत. 

स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण तरुणाईला उपलब्ध व्हावे यासाठी शासकीय अनुदानित आणि स्वंय अर्थसहाय्यीत कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे. 2022 पर्यंत 4 कोटी 50 लाख तरुणाई कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ठ सरकारने ठरवले आहे.   

कौशल्य विद्यापीठाचा मसुदा, कौशल्य महाविद्यालय निर्माण करण्याचे नियम तयार करण्याची जबाबदारी समितीवर असेल, ही समिती सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगला (युजीसी) आपला अहवास सादर करेल यासाठी समितीची स्थापन करण्यात आली. समितीचे सचिव डॉ. श्रीमती सुवर्णा, सदस्य, सदस्य माजी कुलगुरु विजय खोले, माजी प्राचार्य डॉ. श्रीमती इंदु सहानी, डॉ. उदय साळुंखे यांची समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News