कोरोना रुग्णांचा संसर्ग टाळण्यासाठी इनटयूबेशन बॉक्‍सची निर्मिती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 April 2020
  • त्याद्वारे डॉक्‍टर आणि नर्स यांचा रुग्णाशी थेट संबंध न येता सुरक्षितरित्या उपचार करण्यास मदत होणार आहे.

मुंबई : कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार किंवा तपासणी करतांना डॉक्‍टरांना बाधा होण्याची शक्‍यता असते. त्यामूळे पश्‍चिम रेल्वेने कोरोना उपचारासाठी इनटयूबेशन बॉक्‍सची निर्मिती केली आहे. त्याद्वारे डॉक्‍टर आणि नर्स यांचा रुग्णाशी थेट संबंध न येता सुरक्षितरित्या उपचार करण्यास मदत होणार आहे.

लोअर परळ वर्कशॉपमधील रेल्वे कर्मचाऱ्यांनी हा इनटयूबेशन बॉक्‍स तयार केला आहे. रुग्णांच्या डोक्‍याकडील भाग या बॉक्‍समध्ये टाकण्यासाठी वक्रकार आकार आहे. या बॉक्‍सला दोन होल आहेत. त्यामधून वैद्यकीय कर्मचारी हात घालून रुग्णांचा उपचार करू शकतात. त्यामूळे रुग्णाची तपासणी करताना, व्हेंटिलेटर लावताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा थेट संबंध टळणार आहे.

वैद्यकीय कर्मचारी पथकानेच अशा सामग्री तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. जेणेकरून वैद्यकीय कर्मचारी आणि कोरोना रुग्ण यांचा थेट संबंध येणार नाही. त्यामुळे लोअर परळ येथे इनट्यूबेशनचे पाच बॉक्‍स तयार केले गेले आहेत. लोअर परळ वर्कशॉपचे उपमुख्य यांत्रिक अभियंता अरुण कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हेबॉक्‍स तयार करण्यात आले आहे. सध्या जगजीवन राम रुग्णालयात याचा वापर केला जाणार असल्याची, माहिती पश्‍चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क विभागाने दिली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News